ओडीसीने आपल्या सर्व लि-आयन उत्पादनांवर एक्स्टेण्डेड बॅटरी वॉरंटी प्रोग्राम लाँच केला
कंपनी तिच्या सर्व लि-आयन मॉडेल्सवर अतिरिक्त २ वर्षांची एक्स्टेण्डेड बॅटरी वॉरंटी देते
मुंबई: ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्स या भारतातील झपाट्याने विकसित होणाऱ्या प्रिमिअम इलेक्ट्रिक वेईकल उत्पादक कंपनीने तिच्या मॉडेल्समधील बॅटऱ्यांकरिता एक्स्टेण्डेड वॉरंटी प्रोग्राम लाँच करत ग्राहकांसोबतचे संबंध अधिक दृढ केले. १ मार्च २०२४ पासून ओडीसी उत्पादने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना निवडक मॉडेल्सवर जवळपास ५ वर्षांपर्यंत एक्स्टेण्डेड वॉरंटीमधून फायदा मिळू शकतो.
एक्स्टेण्डेड वॉरंटी प्रोग्राम अंतर्गत बॅटरी वॉरंटी प्रमाणित ३ वर्षांपासून एकूण ५ वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते, ज्यामध्ये बॅटरी घटकांना कव्हर करण्यात येईल. हे विस्तारीकरण ग्राहकांना ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्समधील त्यांच्या गुंतवणूकीसाठी अतिरिक्त संरक्षण व पाठिंबा देते. एक्स्टेण्डेड वॉरंटी प्रोग्राम पुढील ओडीसी मॉडेल्ससाठी लागू आहे: ईव्होकिस, ई२गो+, ई२गो लाइट, हॉक प्लस, हॉक लाइट, रेसर लाइट, व्ही२+/व्ही२ आणि वेडर.
याप्रसंगी मत व्यक्त करत ओडीसी इलेक्ट्रिक वेईकल्स प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नेमिन वोरा म्हणाले, ''एक्स्टेण्डेड वॉरंटी प्रोग्राममधून ओडीसीची ग्राहक व शाश्वत गतीशीलतेप्रती कटिबद्धता दिसून येते. या उपक्रमासह ग्राहक बॅटरीमध्ये कोणताही बिघाड होण्याच्या काळजी शिवाय त्यांच्या ईव्हींचा वापर करू शकतात. यामुळे ईव्ही दीर्घकाळापर्यंत त्यांच्या आयसीई प्रतिस्पर्धींच्या तुलनेत अधिक किफायतशीर होतील. तसेच ग्राहकांच्या सुरूवातीच्या गुंतवणूकीला पूरक प्रतिकिलोमीटर कमी खर्च आणि कमी कार्बन फूटप्रिंटचा पाठिंबा मिळेल.''
एक्स्टेण्डेड वॉरंटी प्रोग्रामची ठळक वैशिष्ट्ये:
1. प्लान उत्पादनाच्या खरेदीच्या ३६५ दिवसांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.
2. ग्राहक बॅटरीचे वय व क्षमतेनुसार बॅटरी खर्चाकरिता अमर्यादित क्लेम्स करू शकतात.
3. कंपनीच्या अधिकृत सर्विस सेंटर्समध्ये सर्विसिंग करता येईल.
हा एक्स्टेण्डेड बॅटरी वॉरंटी प्रोग्राम ओडीसीच्या अधिकृत डिलर्सच्या माध्यमातून देशभरात उपलब्ध असेल, ज्यामधून भारतभरातील ग्राहकांना त्यांच्या इलेक्ट्रिक वेईकल्ससाठी सुधारित वॉरंटी कव्हरेज आणि सर्वसमावेशक पाठिंबा सोईस्करपणे उपलब्ध होईल.