नवी दिल्ली : (Pakistani High Commission official Danish was an ISI agent) ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर भारताने देशाअंतर्गत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या घरभेद्यांचा शोध सुरु केला. यामध्ये गेल्या आठवड्यात, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह वेगवेगळ्या राज्यांमधून अनेक व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. हे सगळे पाकिस्तानी उच्चायुक्तालयात अधिकारी असणाऱ्या आणि आयएसआय एजंट एहसान उर रहीम उर्फ दानिश आणि मुझम्मिल हुसेन उर्फ सॅम हाश्मी यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. या आरोपींना अटक केल्यानंतर, आयएसआय एजंट दानिश आणि मुझम्मिल यांनी या हेरगिरी करणाऱ्या आरोपींकडून भारतीय सिम कार्ड मागवले होते, असे समोर आले आहे.
१३ मे रोजी भारताने पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिशला देश सोडण्यास सांगितले होते. अशा परिस्थितीत, गुप्तचर सूत्रांनी माहिती दिली की, गेल्या ५ वर्षांपासून पाकिस्तानी उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या आयएसआय हँडलर्सकडून व्हिसाच्या बदल्यात सिम कार्ड मागण्याचा व्यवसाय सतत चालवला जात आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली हरियाणातील नूह येथून अटक केलेल्या आरिफने तपास यंत्रणांना सांगितले की, २०१८ ते २०२४ दरम्यान, पाकिस्तानी उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याला पाकिस्तानी व्हिसा सुविधा देण्याच्या बदल्यात भारतीय सिम कार्ड देण्यास अनेक वेळा सांगितले होते. ग्रामीण भागात राहणारे कमी शिक्षित भारतीय ज्यांचे नातेवाईक पाकिस्तानात राहतात आणि त्यांना पाकिस्तानला जाण्यासाठी व्हिसाची आवश्यकता आहे, अश्यांना ते लक्ष्य करत होते.
भारतीय नंबरचे सिम कार्ड कसे वापरले गेले?
आता मोठा प्रश्न असा निर्माण होतो की पाकिस्तानी उच्चायुक्तालयात बसलेले आयएसआय हँडलर भारतीय नंबरच्या सिमकार्डचे काय करत होते? या रॅकेटचा तपास करणाऱ्या भारतीय गुप्तचर संस्थेतील एका सूत्राने माहिती दिली की, भारतीय क्रमांक असलेले सिम कार्ड आयएसआय आणि त्यांचे हँडलर्स तीन प्रकारे वापरत होते. पाकिस्तान उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या आयएसआयच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या भारतीय नंबरवरून त्यांच्या हेरांशी कधीही संवाद साधला नाही. ते नेहमी त्याच्या हेरांशी त्याच भारतीय नंबरवरून बोलत असे जे त्यांना व्हिसा अर्जदाराने किंवा त्यांच्या हेरांनी दिले होते, कारण जर त्याचा हेर पकडला गेला तर त्याला तो नंबर त्याचा नाही असे म्हणण्याचा स्वतःता बचाव करण्याचा पर्याय असतो आणि तपास यंत्रणेचे आरोप निराधार ठरवले जाऊ शकतात.
गुप्तचर यंत्रणेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा क्रमांक +91 असा कोड केलेला असल्याने आणि आयएसआय हॅकर किंवा हँडलर कधीकधी भारतीय संरक्षण विभागाचा अधिकारी म्हणून तर कधीकधी दुसऱ्या विभागाचा अधिकारी म्हणून शुद्ध हिंदीत बोलत असल्याने, त्यांच्या जाळ्यात एखादा सैनिक किंवा पोलिस अडकण्याची शक्यता जास्त होती. उदाहरणार्थ, जर आपण अलिकडच्या पहलगाम हल्ल्यानंतरच्या परिस्थितीवर नजर टाकली तर, सीमेपलीकडे बसलेल्या आयएसआय एजंट्सनी अनेक भारतीय सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना फोन करून सैन्याच्या हालचालींबद्दल माहिती मागितली. सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना हे सर्व कॉल +91 कोड असलेल्या भारतीय नंबरवरून आले होते आणि ते व्हॉट्सअॅपवर आले होते.
पाक उच्चायोगात तैनात असलेले आयएसआय हँडलर या नंबरवरून इस्लामाबादमधील आयएसआय सायबर कमांड सेंटरमध्ये बसलेल्या हॅकर्सना व्हॉट्सअॅप लॉगिन करून देत असत, जेणेकरून भारतीय सैन्य आणि पोलिसांची हेरगिरी करता येईल आणि त्यांचे फोन हॅक करता येतील. या भारतीय सिमकार्डचा तिसरा आणि सर्वात मोठा वापर आयएसआयकडून जम्मू आणि काश्मीरमधील सैनिक आणि पोलिसांचे फोन हॅक करण्यासाठी किंवा त्यांच्याकडून गुप्त माहिती गोळा करण्यासाठी केला जातो.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\