गांधीनगर :
अहमदाबादला झालेल्या एअर इंडियाच्या ए-१७१ विमान अपघातात अभिबेन पटेल यांचाही दुर्देवी
मृत्यु झाला. लंडनहून त्या आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी गुजरातला आल्या होत्या.
अभिबेन आपल्या वृद्ध आईची काळजी घेण्यासाठी दोन आठवड्यांपूर्वीच भारतात आल्या होत्या. अभिबेन यांचा मुलगा मीर हा लंडनमध्येच होता. पहिल्यांदाच आपल्या मुलाला एकटे सोडून त्यांनी प्रवास केला.
अभिबेन या मूळ गुजरातच्या होत्या. २०१६मध्ये त्या कामाच्या शोधात यूकेला गेल्या. याच दरम्यान, अभिबेन सलूनमध्ये काम करू लागल्या. त्या सलूनची व्यवस्थापक म्हणून काम करत होत्या. शनिवार, १४ जून रोजी पुन्हा कामावर परतणार होत्या. भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध तणावाने उड्डाणे रद्द झाली होती. त्यामुळे अभिबेन यांचा भारत प्रवास लांबला होता.
सलूनमधील त्यांच्या सहकाऱ्यांना अभिबेन यांच्या मृत्यूची बातमी कळताच शोक व्यक्त केला. ‘एक मेहनती, विश्वासार्ह कर्मचारी गमवल्या’, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. एअर इंडियाचे ‘बोईंग ७८७ ड्रीमलायनर’ विमान उड्डाणानंतर काही सेकंदातच कोसळले. या अपघातात विमानातील २४१ जणांचा मृत्यू झाला आहे.