मुंबई : (Joe Biden diagnosed with Prostate Cancer) अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांनी कॅन्सर झाल्याची माहिती समोर आली आहे. बायडन यांना प्रोटेस्ट कॅन्सरचे निदान झाले आहे. हा कॅन्सर त्यांच्या हाडांमध्ये पसरलेला असल्याचं त्यांच्या कार्यालयाने रविवारी १८ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात सांगितले.
जो बायडन हे ८२ वर्षांचे असून गेल्या काही दिवसांपासून त्यांना लघवीची समस्या उद्भवत असल्यामुळे त्यांनी शुक्रवारी डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यांनंतर डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय चाचण्यांमधून त्यांना प्रोस्टेट कॅन्सरचे निदान झाले. सध्या उपचाराचे विविध पर्याय विचाराधीन असल्याचं बायडन आणि त्यांच्या कुटुंबाने म्हटले आहे. हा कॅन्सर हार्मोन-संवेदनशील असल्याने त्यावर उपचार होऊ शकतात असं माजी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने म्हटले आहे. बायडन यांना कॅन्सरचे निदान झाल्यानंतर अमेरिकेतील दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.
Personal Office of Former US President Joe Biden issues a statement: Last week, Former President Joe Biden was seen for a new finding of a prostate nodule after experiencing increasing urinary symptoms. On Friday, he was diagnosed with prostate cancer, characterized by a Gleason… pic.twitter.com/yOwB8QDKfK
अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, "मी आणि मेलानिया ट्रम्प आम्ही जो बायडन यांच्या आजाराच्या निदानाबद्दल ऐकून दुःखी आहेत. आम्ही जिल (जो बायडन यांच्या पत्नी) आणि त्यांच्या कुटुंबासाठी मनापासून सदिच्छा व्यक्त करतो, मी बायडन यांना लवकरात लवकर पूर्णं बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो." असे त्यांनी म्हटले.
"जो हे लढवय्ये आहेत" - कमला हॅरिस
जो बायडन यांच्या कार्यकाळात उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या कमला हॅरिस यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं आहे की, त्या आणि त्यांचे पती डग एमहॉफ बायडन कुटुंबासाठी प्रार्थना करत आहेत. त्यांनी पुढे म्हटले आहे की, "जो हे लढवय्ये आहेत. ज्या ताकद, चिकाटी आणि आशावादाने त्यांनी त्यांचे आय़ुष्य आणि नेतृत्व घडवले त्याच गुणांनी ते ही लढाई लढतील."
बराक ओबामा यांची जो बायडन यांच्यासाठी भावनिक पोस्ट
२००९ ते २०१७ या काळात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या बराक ओबामा यांनीही त्यांच्या 'एक्स' वर जो बायडन यांच्यासाठी पोस्ट लिहिली आहे. ओबामा यांनी लिहिले आहे की, ते आणि त्यांची पत्नी मिशेल बायडन कुटुंबाचाचा विचार करत आहेत. ते म्हणालेत, "कॅन्सरविरुद्ध लढा देण्यासाठी कुणीही जोपेक्षा अधिक प्रयत्न केलेले नाहीत आणि मला खात्री आहे की जो ही लढाई आपल्या नेहमीच्या दृढनिश्चय आणि नम्रतेने लढतील. त्यांनी लवकरात लवकर पूर्ण बरं होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो," असं ओबामा यांनी म्हटलं आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\