कोण डोनाल्ड ट्रम्प? मी त्यांना राजकारणी मानत नाही : जितेंद्र आव्हाड
12-May-2025
Total Views | 30
मुंबई : कोण डोनाल्ड ट्रम्प? मी त्यांना राजकारणी मानत नाही, असे वक्तव्य शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. सोमवार, १२ मे रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भारत आणि पाकिस्तान युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्ती केली. यावर आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "आमच्यासाठी कोण डोनाल्ड ट्रम्प? डोनाल्ड ट्रम्प आमच्या देशाची दिशा ठरवणार का? मी तर त्यांना राजकारणीसुद्धा मानत नाही. रिचर्ड निक्सन, हेन्री किसिंजर, बिल क्लिंटन हे सगळे राजकारणी होते. डोनाल्ड ट्रम्प हा राजकारणी नाही तर ते व्यावसायिक आहेत. प्रचंड पैसे आणि ध्रुवीकरणाचे राजकारण यासाठी आज ते अमेरिकेत नेता बनले आहेत. नुसता द्वेष तयार करायचे त्यांचे काम आहे. ज्यापद्धतीने डोनाल्ड ट्रम्प पुढे जात आहेत, अजून पाच वर्षे त्यांचे हेच परराष्ट्र धोरण राहिले तर भारतीयांना अमेरिकेत राहणे मुश्कील होईल," असेही ते म्हणाले.