शाहरुख खानने ‘इन्सायडर-आउटसाइडर’ टॅग फेटाळले; ‘दुवा’ची आई म्हणूनच, दीपिका पदुकोणची सर्वोत्तम भूमिका!

    01-May-2025
Total Views |
 
Shah Rukh Khan rejects insider-outsider tag
 
मुंबई : ( Shah Rukh Khan rejects insider-outsider tag ) वेव्स समिट २०२५ च्या पहिल्या दिवशी अभिनेता शाहरुख खानने ‘The Journey: From Outsider to Ruler’ या सत्रात सहभागी होताना फिल्म इंडस्ट्रीतील ‘इन्सायडर-आउटसाइडर’ वादावर स्पष्ट भूमिका मांडली. “मला या इन्सायडर-आउटसाइडर या भेदभावाचीच अडचण वाटते. कुठल्याही क्षेत्रात स्वतःची जागा निर्माण करणे, हाच खरा संघर्ष असतो. हे तुमचं जग आहे असं तुम्हालाच वाटलं पाहिजे. कोणी तुमच्यासाठी जागा करून देणार नाही,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
 
स्वतःच्या प्रवासाविषयी सांगताना ते म्हणाले, “मी जेव्हा फिल्म इंडस्ट्रीत आलो, तेव्हा मला वाटलं की हे माझंच जग आहे. आणि खरंच, इंडस्ट्रीने मला खुल्या मनाने स्वीकारलं.” अपयश आणि नकारात्मकतेबद्दल बोलताना शाहरुख म्हणाले, “जेव्हा माझे चित्रपट चालत नाहीत, तेव्हा मला दु:ख दुप्पट वाटतं. मला असं वाटतं की मी माझ्या प्रेक्षकांना कमीपणा दिला आहे. अशावेळी मी बाथरूममध्ये जाऊन रडतो.” मात्र, त्याचवेळी ते पराभवावर मात करण्यासाठी स्वतःला सावरतात, “मी सध्या स्वयंपाक शिकतो आहे,” असे त्यांनी हसत सांगितले.
 
करिअरमधील एक मजेशीर किस्सा सांगताना त्यांनी सांगितले की, “करण जोहर एकदा मला एका स्क्रिप्टसाठी भेटायला आला होता, ज्यात संपूर्ण चित्रपटभर मला स्कर्ट घालायचा होता. तेव्हाच मी पहिल्यांदा एखादी स्क्रिप्ट नाकारली.” समाजमाध्यमांवर भाष्य करताना शाहरुख म्हणाले, “आज सगळ्यांना दिसायला हवं आहे, पण त्यामध्ये स्वतःला पाहणं विसरून गेले आहेत. स्वतःच्या वाटचालीकडे लक्ष देणं गरजेचं आहे.”
 
याच कार्यक्रमात दीपिका पदुकोणने वेव्स समिटचं कौतुक करताना सांगितलं की, “क्रिएटिव्ह इंडस्ट्रीजना एकत्र आणण्याचा प्रयत्न आणि तंत्रज्ञानासोबतचा संवाद खरोखरच नावीन्यपूर्ण आहे. भारत आता जागतिक व्यासपीठावर उभा राहत असताना हा उपक्रम अत्यंत योग्य वेळी झाला आहे.”
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला असताना, शरद पवारांनी अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७ वर्षे एकहाती पक्ष सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी अचानक राजीनामा द्यावा आणि तो शरद पवारांनी स्वीकारावा, इतक्यापुरती ही घटना मर्यादीत नाही. त्यामुळे हा राजीनामा खरोखरच स्वेच्छेने दिला गेला की पक्षातील गटबाजीमुळे त्यांना हटवण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली असली, तरी रोहित पवार आणि समर्थकांत भलती नाराजी पसरल्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121