मुंबई : जगप्रसिद्ध अमेरिकन इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे भारतात आगमन झाले आहे. टेस्लाचा भारतातील पहिले दालन मुबंई येथे सुरू झाला असून, भारतीय बाजारपेठेत बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने आपली दमदार एण्ट्री केली आहे.
मुंबईत टेस्लाचे शोरूम कुठे?
इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे मुंबईतील शोरूम शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बीकेसी येथे आहे. कंपनीने भाडे तत्वावर घेतलेल्या ४,००० चौरस फूट असलेली जागेतील या शोरूमचे भाडे दरमहा ३५ लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
भारतात टेस्लाची किंमत किती?
भारताती टेस्लाने लॉन्च केलेल्या मॉडेल वायची किंमत ५९.८९ लाख रुपयांपासून सुरू होत आहे. भारतीय बाजारपेठत पूर्णपणे आयात केलेल्या टेस्लाच्या वाहनांवर ७० टक्के ते १०० टक्के पर्यंत आयात कर आकारला जाणार आहे, ज्यामुळे सर्वसामान्य भारतीय ग्राहकांसाठी ही किंमत मोठी ठरणारी आहे.
भारतासाठी टेस्लाचे मॉडेल Y लॉन्च
टेस्लाने भारतीय ग्राहकांसाठी आपल्या जुन्या सेगमेंटमधील रिफ्रेश केलेले मॉडेल Y लॉन्च केले आहे. भारतीय बाजारपेठेत हे मॉडेल लाँग रेंज RWD आणि लाँग रेंज AWD. दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहे. ज्यात ड्युअल-टोन ब्लॅक अँड व्हाईट केबिन, १५.४ इंच सेंट्रल टचस्क्रीन आणि वायरलेस चार्जिंग, USB-C पोर्ट, व्हॉइस कमांड, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि अॅप-आधारित वाहन लॉक सारख्या हायटेक सुविधा पाहायला मिळत आहेत.
सध्या शोरूमच्या उद्घाटनासाठी शांघायहून मुंबईत सहा मॉडेल Y SUV आयात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, टेस्लाचे सीईओ असलेले एलोन मस्क यांनी भारतीय ग्राहकांना टेस्ला अधिकाअधिक परवडणारी असावी यासाठी भारत सरकारकडे आयात शुल्क कपात करण्याची मागणी केली आहे.