कल्याण : केडीएमसी हद्दीतील 65 अनधिकृत बांधकाम इमारतीमधील रहिवासियांनी महापालिका प्रशासनाने घरे खाली करण्याच्या नोटीसा पुन्हा पाठविल्या आहेत. या विरोधात दाद मागण्याकरिता इमारतीमधील रहिवासी 15 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलन करून राज्य सरकारचे या प्रकरणी लक्ष वेधणार आहेत.
महापालिकेच्या बनावट सही शिक्क्यांचा वापर करून बिल्डरांनी 65 अनधिकृत इमारती उभ्या केल्या आहेत. महापालिकेची बनावट बांधकाम इमारती तयार करून रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविले. या इमारतीमधील घरे नागरिकांना विकल्यामुळे त्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे. 65 अनधिकृत बांधकाम प्रकरणाचा पर्दाफाश वास्तुविशारद संदीप पाटील यांनी केला. या प्रकरणात पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 19 नोव्हेंबर रोजी 2024 रोजी न्यायालयाने महापालिकेस तीन महिन्यांच्या आत या इमारती पाडण्याचे आदेश दिले. त्यानंतर न्यायालयाने रहिवासियांना काही अंशी दिलासा दिला. इमारती नियमिती करणाची मुभा दिली होती. त्यासाठी इमारत धारकांनी प्रस्ताव पाठविले. ते प्रस्ताव महापालिकेच्या नगररचना विभागाने फेटाळून लावले. हे प्रस्ताव अपूर्ण होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 65 अनधिकृत इमारतीमधील नागरिकांना बेघर होऊ देणार नाही असे आश्वासन दिले. त्यापश्चात याचिकाकर्ते पाटील यांनी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात नसल्याने कायदेशीर नोटीस बजावली. त्यानंतर पुन्हा महापालिकेने इमारतीमधील नागरिकांना नोटीस बजावल्या. या कारवाईच्या विरोधात रहिवासी 15 जुलैला आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत.
शिवलिला इमारतीत राहणारे दिनेश देवाडी यांनी सांगितले की, आमच्या इमारतीला नोटीस बजावली आहे. माझी मुलगी इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकते. आम्ही बेघर झालो तर माझ्या मुलीचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत येणार आहे. त्यामुळे बाधितांनी 15 जुलैच्या धरणे आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.