मुंबई : विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी सोमवार, दि. ३ मार्च रोजी विधानपरिषदेच्या कामकाजासाठी तालिका सभापतींची नियुक्ती सभागृहात जाहीर केली.
विधानपरिषद तालिका सभापती म्हणून सदस्य निरंजन डावखरे, कृपाल तुमाने अमोल मिटकरी, राजेश राठोड, सुनील शिंदे आणि चित्रा वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थित तालिका अध्यक्ष कामकाज पाहतील.