वॉशिंगटन डीसी : फेसबुकसारख्या स्वतंत्र माध्यमावर पक्षपात करणाऱ्या इंडीपेंडेट फॅक्ट चेकर्सला आता मेटाने चांगलाच दणका दिला आहे. मेटाने ८ जानेवारी रोजी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या कंटेंटबाबत सुधारित धोरण जाहीर केले, फॅक्ट चेकर्ससोबत असलेली भागीदारी संपवण्याचा निर्णय घेतला. आता या फॅक्ट चेकर्सची कम्युनिटी नोट्स घेणार आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी व्हिडीओ मेसेज आणि ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे.
मेटाचा थर्ड-पार्टी फॅक्ट-चेकिंग प्रोग्राम २०१६ मध्ये सुरू करण्यात आला होता. या अंर्तगत कंपनी स्वतंत्र थर्ड-पार्टी फॅक्ट-चेकर्ससोबत भागीदारी करते ज्यामुळे खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती उजेडास येईल. परंतु मेटा मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांमध्ये या फॅक्ट चेकींग संघटनांचा हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढत गेला. कारण नसताना सेन्सोरशिप लादली जात होती. यावर आळा बसवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मार्क झुकेरबर्गने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार अमेरीकेमध्ये फॅक्ट चेकर्स मोठ्या प्रमाणात राजकीयदृष्टी पक्षपात करीत असतात. लोकांचा विश्वास कमावण्याऐवजी, गमावला गेला आहे. झुकेरबर्गने यांनी उचलेलं हे पाऊल म्हणजे ट्रम्प यांच्या सरकारसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी योजलेलं धोरण असल्याचे बोलले जात आहे.
अलिकडच्या काळात ट्रम्प यांनी मेटाच्या फॅक्ट चेकींग धोरणावर टीका केली होती, ट्रम्प यांनी काळजी व्यक्त केली की उजव्या विचारसरणीच्या लोकांचा आवाज जाणीवपूर्वक दाबला जातोय. मेटाच्या या नव्या धोरणाचे ट्रम्प यांनी स्वागत केले आहे.