योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटावरुन सेन्सॉर बोर्डाला नोटीस, नेमकं काय आहे प्रकरण?

    16-Jul-2025   
Total Views |

मुंबई : (Ajey: The Untold Story of a Yogi) 'अजय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी' या चित्रपटावरुन मुंबई उच्च न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाला नोटीस पाठवली आहे. सेन्सॉर बोर्डाकडून मनमानी कारभार करत या चित्रपटाला मान्यता देण्यास विलंब होत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. आता या चित्रपटासंदर्भात ही मोठी अपडेट समोर आली आहे.


बार अँड बेंचने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर ‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ ए योगी’ चित्रपटाबाबत अपडेट दिली आहे. "मुंबई उच्च न्यायालयाने चित्रपटाला मान्यता मिळण्यात मनमानी करत विलंब केल्यामुळे सेन्सॉर बोर्डाला नोटीस बजावली आहे. ‘अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ ए योगी’ हा चित्रपट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा संघर्षमय जीवनप्रवास चित्रित करणारा आहे. तसेच हा चित्रपट 'द माँक हू बिकम चीफ मिनिस्टर' या पुस्तकावर आधारित आहे" या आशयाची पोस्ट करण्यात आली आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी गंभीर दखल घेत केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाला (Central Board of Film Certification - CBFC) नोटीस बजावली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर १७ जुलै रोजी याचिकेवर सुनावणी होणार आहे.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\