मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डॉ. विलास डांगरेंचे निवासस्थानी जाऊन केले अभिनंदन

    30-Jan-2025
Total Views | 43

cm devendra fadnavis
 
नागपूर : (CM Devendra Fadnavis) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नागपूर दौऱ्यादरम्यान वेळ काढून पद्मश्री बहुमानाने सन्मानित डॉ. विलास डांगरे (Dr. Vilas Dangre) यांच्या तपोवन येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देत त्यांचे अभिनंदन केले.
 
होमिओपॅथिक क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक रुग्णाला त्यांनी योग्य औषधोपचारासह नवा विश्वास दिला. होमिओपॅथी चिकित्सेबाबत त्यांना पद्मश्री जाहीर झाल्याने या चिकित्सेचा सन्मान झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
 
गोरगरिबांना योग्य उपचारासह विश्वासही मिळाला पाहिजे. हा विश्वास देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न आजवर करत आलो. यापुढेही करत राहीन, असे डॉ.डांगरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:हून घरी भेट देऊन दिलेल्या शुभेच्छांमुळे आम्ही भारावून गेल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121