घरातील सर्व वाद संपून पवार कुटुंब एकत्र येऊ दे! आशा पवार यांचे पांडुरंगाला साकडे
01-Jan-2025
Total Views | 44
पंढरपूर : घरातील सर्व वाद संपू दे. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशा पवार यांनी विठुरायाकडे घातले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आशा पवार यांनी पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतले.
१ जानेवारी रोजी पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर आशा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, सर्वांना नवीन वर्ष सुखात जाऊ दे, असे पांडुरंगाला साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले. तसेच घरातले सगळे वाद संपू दे, अशी प्रार्थनाही देवाकडे केल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याबाबतची ईच्छाही त्यांनी व्यक्त केली.
विधानसभा निवडणूकीनंतर पवार कुटुंब एकत्र येण्याची ईच्छा कुटुंबातील अनेकांनी बोलून दाखवली. काही दिवसांपूर्वीच रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनीदेखील दोन्ही पवारांनी एकत्र यावे, अशी भावना व्यक्त केली. त्यानंतर आता अजित पवारांच्या आईंनीदेखील हीच ईच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे पवार कुटुंब एकत्र येणार का? अशा चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत.