तिरुपतीच्या प्रसादानंतर जगन्नाथ पुरीत वापरल्या जाणाऱ्या तुपाचीही चाचणी होणार

ओडिशा सरकारने दिले आदेश

    25-Sep-2024
Total Views |

Jagannath Puri Temple

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Jagannath Puri Ghee Investigation)
आंध्र प्रदेशच्या तिरुपती मंदिरातील लाडू प्रदासात चरबीयुक्त तुपाचा वापर केल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर आता ओडिशा सरकारने पुरीच्या जगन्नाथ मंदिरात वापरल्या जाणाऱ्या तुपाची गुणवत्ता तपासण्याचे आदेश दिले आहेत. जगन्नाथ मंदिराच्या महाप्रसादात संभाव्य भेसळ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुरीचे जिल्हाधिकारी सिद्धार्थ स्वैन यांनी मंगळवार, दि. २४ सप्टेंबर रोजी ही माहिती दिली.

हे वाचलंत का? : तिरुपती प्रकरणाची 'SIT' चौकशी होणार?

ओडिशा सरकारच्या मालकीच्या ओएमएफइडी या सहकारी संस्थेने तयार केलेले तूप जगन्नाथ मंदिरात वापरले जाते. हे तूपही भाविक मंदिराच्या आतील दिव्यांमध्ये वापरतात. जगन्नाथ मंदिराच्या महाप्रसादात वापरल्या जाणाऱ्या तुपात कोणत्याही प्रकारची भेसळ झाल्याचा आरोप झालेला नाही. असे असतानाही दर्जा टिकवण्यासाठी तुपाचे प्रमाण तपासले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात लाडू म्हणून दिल्या जाणाऱ्या प्रसादामध्ये गोमांस आणि डुकराची चरबी आढळल्याच्या वादानंतर ओडिशा सरकारने हा निर्णय घेतला आहे.