मुंबई - वसंत कानेटकर लिखित 'सूर्याची पिल्ले' हे तीन अंकी नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येणार आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २२ सप्टेंबर रोजी मुंबईतील रॉयल ऑपेरा हाऊस येथे होणार आहे. सुनील बर्वे, नितीन भालचंद्र नाईक यांनी या नाटकाची निर्मिती केली. प्रतिमा कुलकर्णी यांनी हे नाटक दिग्दर्शित केले आहे. या नाटकात आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव, सुहास परांजपे, शर्वरी पाटणकर, उमेश जगताप, अतिषा नाईक आणि अतुल परचुरे प्रमुख भूमिकेत आहेत. अशोक पत्की यांनी या नाटकाला संगीत दिले आहे.