"तुम्ही बलात्काराची तुलना सायकल चालवण्याशी करता...", कंगनावर केलेल्या वादग्रस्त विधानावर कंगनाचा पलटवार
29-Aug-2024
Total Views |
नवी दिल्ली : पंजाबचे माजी खासदार सिमरनजीत सिंह मान यांनी भाजप खासदार कंगना राणौतला बलात्काराचा अनुभव असल्याचे वक्तव्य केले होते. आपल्याला सायकल चालवता चालवता सायकल चालवायची सवय होते, तशीच कंगणावर बलात्कार झाल्याने तिलाही बलात्काराची सवय झाल्याचे सिमरनजीत सिंह मान यांनी वक्तव्य केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून (X) ट्विटर अकाऊंटवर कंगनाने पलटवार करत सिमरनजीत सिंह यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
कंगनाने ट्विट करत लिहिले की, "या देशात बलात्कार ही समस्या अनेकांना क्षुल्लक वाटत आहे. आज एका ज्येष्ठ नेत्याने बलात्काराची तुलना सायकल चालवण्याशी केली आहे. महिलांवरील होणारा बलात्कार आणि हिंसाचार या पुरूषप्रधान संस्कृतीच्या मानसिकतेत खोलवर रूजलेला आहे. ज्यामुळे महिलांचा वापर छेडछाड आणि महिलेसोबत केवळ टिंगल करण्यापुरताच महिलेचा वापर होतो असा समज आहे. मग ती महिला एखादी उच्च राजकारणी आणि चित्रपट निर्माती असली तरीही," असे ट्विट करत कंगनाने सोशल मीडिया पोस्टद्वारे सुनावले आहे.
It seems this country will never stop trivialising rape, today this senior politician compared getting raped to riding a bicycle no wonder rapes and violence against women for fun, is so deep rooted in the psyche of this patriarchal nation that it is casually used to tease or… pic.twitter.com/ZHHWPEXawq
कंगना राणौतवर टीका करताना मान म्हणाले की, "कंगनाला विचारा की बलात्कार कसा होता. त्याची माहिती कंगनाला आहे तुम्ही त्याबद्दल कंगनाला विचारू शकता. जशी आपण सायकल चालवतो तसा आपल्याला सायकल चालवण्याचा अनुभव येतो. तसाच बलात्काराचा कंगनाला अनुभव आहे, असे म्हणत मान यांची कंगना राणौतवर टीका करताना जीभ घसरली आहे.
कोण आहेत सिमरनजीत सिंह मान?
सिमरनजीत सिंह मान यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे आहेत. ते खलिस्तानचे समर्थक आहेत. ऑपरेशन ब्ल्यू स्टार आणि शीख विरोधी दंगलीच्या निषेधार्थ त्यांनी आपली सरकारी नोकरी सोडली होती. त्यांनी भगलापूर येथे ५ वर्षे तुरूंगवास भोगला आहे. त्यानंतर १९८९ मध्ये त्यांनी निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले होते. अशातच कंगनाविरोधात केलेल्या वक्तव्यावरून मान पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत.