अ. भा. सा. प. पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे ‘अहिल्यादेवी लेखन स्पर्धेचे’ आयोजन

    26-Aug-2024
Total Views |

अहिल्यादेवी  
 
मुंबई - अखिल भारतीय साहित्य परिषद (साहित्य भारती), पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘अहिल्यादेवी लेखन स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे. शालेय गट, महाविद्यालयीन गट आणि खुला गट अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. शालेय गटासाठी अहिल्यादेवी जीवन व कार्य, अहिल्यादेवी : आदर्श प्रशासक, अहिल्यादेवी : एक समाज सुधारक महाविद्यालयीन गटासाठी अहिल्यादेवी आणि औद्योगिकरण, अहिल्यादेवी एक मुत्सद्दी राजकारणी, अहिल्यादेवी आज असत्या तर आणि खुल्या गटासाठी अहिल्यादेवींचे सामाजिक व सांस्कृतिक योगदान, स्त्रीत्वाचा जागर करणाऱ्या अहिल्यादेवी, धर्मयोगिनी अहिल्यादेवी हे विषय आहेत. प्रत्येक गटातील प्रथम विजेत्या स्पर्धकासाठी ३००० रुपये स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, द्वितीय विजेत्या स्पर्धकासाठी २००० रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र आणि तृतीय विजेत्या स्पर्धकासाठी १००० रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पारितोषिकांचे स्वरूप असणार आहे. स्पर्धेसाठी लेख पाठविण्याची अंतिम तारीख २० सप्टेंबर आहे.