'कियाराची सिद्धार्थवर काळी जादू..'; अभिनेत्याच्या नावाखाली चाहतीला ५० लाखांनी गंडवलं

    04-Jul-2024
Total Views |

kiara 
 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकांची आवडती जोडी म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी. या दोघांचे जगभरात असंख्य चाहते आहेत. पण त्यांच्याच एका चाहत्याला चक्क सिद्धार्थच्या नावाचा वापर करुन ५० लाखांचा भूर्दंड भोगावा लागला आहे. कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केली आहे, या नावाखाली एका फॅनला हा ५० लाखांचा फटका बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
 

ss 
 
तर मुळातही ही घटना आहे २०२३ ची. मीनू नावाची सिद्धार्थची एक फॅन अमेरिकेत वास्तव्य करते. मीनूने Sidharth Malhotra News FC (@SidMalhotraNews) नावाच्या एका फॅन पेजवर गंभीर आरोप केला आहे. अलीजा नावाच्या व्यक्तीसोबत मीनूने केलेले चॅट देखील तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. अलीजाने सांगितलं की, कियारापासून सिडच्या जीवाला धोका आहे. याशिवाय कियाराने सिद्धार्थसोबत जबरदस्ती लग्न करुन त्याच्या परिवाराला संपवण्याची धमकी दिली आहे. पुढे अलीजाने असंही सांगितलं की, करण जोहर, मनीष मल्होत्रा असे इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी कियाराला यासाठी मदत करत असून कियाराने सिद्धार्थवर काळी जादू करत त्याच्या बँकेचे व्यवहार स्वतःच्या हाती घेतले आहेत. अलीजाने सिद्धार्थसोबत चॅटींग केल्याचे स्क्रीनशॉट पाठवून मीनूला हे सर्व खरं असल्याचं भासवलं.
 

ss 
 
फसव्या अलीजाने तू सिद्धार्थला वाचव असं म्हणत मीनूकडून पैसे उकळले. आणि सिद्धार्थला वाचवण्यासाठी मीनूनेही अलीजाला पैसे पुरवले. पुढे मीनूने पैसे दिल्यावर अलीजाने तिची ओळख दीपक दुबे नावाच्या एका व्यक्तीशी करून दिली. जो सिद्धार्थ मल्होत्राचा बनावट पीआर टीम सदस्य म्हणून समोर आला. त्यानंतर मीनूची ओळख राधिका नावाच्या महिलेशी झाली, जी कियाराच्या टीमची माहिती देणारी होती. राधिका सुद्धा फेक होती. त्यामुळे कलाकारांच्या नावाचा असा गैरवापर करु त्यांच्या चाहत्यांकडून किंवा निश्पाप लोकांकडून पैसे उकळ्याचा प्रकार दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.