स्वा. सावरकर अध्यासन केंद्रातर्फे सावरकरांवर आधारित अभ्यासवर्गाचे आयोजन

    31-Jul-2024
Total Views |
savarkar abhyasvarg 
आचार्य भरतमुनि गुरुकुल आणि स्वा. सावरकर अभ्यासन केंद्र, पुणे यांच्यातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘इंडियन नॉलेज सिस्टिम’ अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या ‘ऑनलाइन राष्ट्रपुरुष अभ्यासमालेचा’ हा एक भाग आहे.
 
१५ ते २१ ऑगस्ट दरम्यान दररोज रात्री ८ ते ९ या वेळेत ऑनलाइन पद्धतीने हे अभ्यासवर्ग होणार आहेत. शालेय विद्यार्थी, नवोदित व्याख्याते, कथाकार आणि अभ्यासक यांच्या दृष्टीने हे अभ्यासवर्ग उपयुक्त असणार आहेत.
 
१५ ऑगस्ट रोजी सावरकरांचे क्रांतिकार्य (व्याख्याते योगेश सोमण) १६ ऑगस्ट रोजी सावरकरांवरील आक्षेप (व्याख्याते अक्षय जोग), १७ ऑगस्ट रोजी सावरकरांचे साहित्य (व्याख्यात्या अश्विनी जांभेकर पितळे), १८ जुलै रोजी सावरकरांचे सामाजिक कार्य (व्याख्याते अक्षय जोग), विज्ञाननिष्ठ सावरकर (व्याख्याते निरज देव), २० ऑगस्ट रोजी सावरकरांचे हिंदुत्व (व्याख्याते अक्षय जोग) आणि २१ ऑगस्ट रोजी सावरकरांची जन्मठेप (व्याख्याते योगेश सोमण) या विषयांवर व्याख्यान होणार आहे. या अभ्यासमालेविषयी अधिक माहिती ८६६९९१२७०३, ७६२०५६५२३६ या क्रमांकावर उपलब्ध आहे.