मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत ज्येष्ठ विनोदी अभिनेते दादा कोंडके यांचे फॅन नसलील असं होणारच नाही. दादा कोंडकेनी त्यांच्या विनोदाचं एक वेगळंच जग निर्माण केलं होतं. अशा या विनोदाच्या बादशाहाचे अर्थात दादा कोंडकेंचा अभिनेता अर्शद वारसी खुप मोठा फॅन आहे. नुकतीच त्याने माझाच्या कट्ट्यावर हजेरी लावली होती त्यावेळी त्याने दादा कोंडकेंच्या चित्रपटांबद्दल अनेक किस्से सांगितले. अर्शद म्हटलं की डोळ्यांसमोर मुन्नाभाई एम.बी.बी.एस, गोलमाल अशी चित्रपटांची यादीच येते.
अर्शदबद्दल एक गोष्ट तुम्हाला माहित आहे का? त्याचं शिक्षण नाशिकमध्ये झालं आहे. त्याविषयीच्या आठवणी सांगताना अर्शद म्हणाला, “मी जेव्हा नाशिकला होतो तेव्हा मी तिथे दादा कोंडकेचे सिनेमे पाहायचो. तेव्हा मला तिथे सैन्यात भर्ती व्हायचं होतं. माझी ती खूप इच्छा होती. पण ते झालं नाही. पण मी नाशिकला अजूनही खूप मिस करतो. कारण ती जागा माझ्यासाठी खूप खास आहे”.
पुढे अर्शदने त्याच्या मराठी कनेक्शनविषयी बोलताना म्हटलं की, “मराठी मला समजतं. माझं शिक्षणही मराठीत झालं होतं. पण जिथे माझं शिक्षण झालं तिथे थोडी इंग्रजीची सक्ती होती. त्यामुळे ती इंग्रजी बोलायची लागायची. मला ९ ते ५ नोकरी करायची नव्हती. मला कलेच्या क्षेत्रात जायचं होतं. मी उत्तम उद्योजक होणार नाही, त्यामुळे ठरवलं होतं की इथेच जायचं आणि माझा एका गोष्टीवर ठाम विश्वास आहे की, कोणतंही काम करण्यात अजिबात लाज वाटत नाही”.
अर्शद वारसी याने १९९६ साली आलेल्या तेरे मेरे सपने या चित्रपटातून अभिनय कारकिर्दिची सुरुवात केली होती. त्यानंतर हलचल, कुछ मिठा हो जाये, मैने प्यार क्यु किया,क्रेझी ४, धमाल अशा अनेक चित्रपटांमध्ये उल्लेखनीय कामं केली.
“दादा कोंडकेंचे चित्रपट पाहूनच...”अभिनेता अर्शद वारसीने सांगितला भन्नाट किस्सा