पार्थ पवारांसह जॅकलिन फर्नांडिसचं बाप्पा दर्शन ते पैसे दान

    28-Aug-2025
Total Views |


मुंबई : राजकारणी आणि कलाकारांची मैत्री काही नवी नाही. अनेक कलाकार आणि राजकीय नेते यांचे अगदी घनिष्ठ सबंध आहेत. पण सध्या चर्चा आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जेष्ठ चिरंजीव पार्थ पवार आणि बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांची. याला कारणही तसंच आहे. दोघांनीही नुकतंच लालबागच्या राजाचं एकत्र दर्शन घेतलं. गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेशत्सोवाच्या पहिल्याच दिवशी अनेक व्हिआयपींनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. पण यात आता एक वेगळाच व्हिडिओ चर्चेत आला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल सुद्धा होत आहे.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससह आणखी काही अभिनेत्रींनी सुद्धा दर्शन घेतलं आहे. पण पार्थ पवारांची हजेरी लक्षणीय ठरली. यावेळी जॅकलिन देसी लुकमध्ये दिसून आली. राजाचे दर्शन घेताना तिनं डोक्यावर ओढणी घेतली होती. तसेच मनोभावे दोघांनी पूजाही केली. मात्र याचवेळी पार्थ पवार यांच्या एका कृतीने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतले.
नेमकं काय घडलं?




दरम्यान लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी पार्थ पवारांनी त्यांच्या खिशातून काही पैसे (नोटा) काढले आणि थेट जॅकलिनच्या हातात दिले. यानंतर जॅकलिनने ते पैसे बाप्पाच्या दानपेटीत टाकले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे पार्थ आणि जॅकलिन यांच्या या नव्या कोऱ्या मैत्रीबद्ल नेटकऱ्यांना फारच प्रश्न पडल्याचं पाहायला मिळत आहे.

यापूर्वी देखील राजकारणी आणि कलाकारांच्या मैत्रीची बरीच चर्चा झाली होती. त्यात अभिनेत्री परिनीती चोप्रा आणि खासदार राघव चड्डा, आदित्य ठाकरे – दिशा पटानी. अशा बऱ्याच जणांचा समावेश आहे.

दरम्यान जॅकलिने देखील यावर्षी तिच्या घरी बाप्पाचं स्वागत केलं आहे.


दरम्यान जॅकलिने देखील यावर्षी तिच्या घरी बाप्पाचं स्वागत केलं आहे.