लग्नाच्या १७ वर्षांनंतर प्रसिद्ध गायक राहूल देशपांडेंचा घटस्फोट

    02-Sep-2025
Total Views |


मुंबई : सिनेविश्वात रोज नवनव्या बातम्या समोर येताना दिसतात. प्रसिद्ध गायक आणि अभिनेते राहूल देशपांडे यांनी नुकतीच त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी एक बातमी शेअर केली आहे. राहूल देशपांडे यांनी त्यांच्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे. त्यांच्या या बातमीने त्यांच्या चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर याबाबत सांगितलं आहे.

दरम्यान राहूल देशपांडे यांचा विवाह नेहा देशपांडे यांच्याशी झाला होता. राहूल आणि नेहा या दोघांनाही रेणुका ही चिमुकली गोड मुलगी आहे. नेहमीच या गोड कुटुंबांचे गोड फोटो आणि व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर पाहायला मिळायचे. पण त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. याविषयी त्यांनी लिहिलं आहे,

राहूल यांची पोस्ट जशीच्या तशी, 



"प्रिय मित्रांनो,
तुमच्या प्रत्येकाचा माझ्या प्रवासात आपापल्या पद्धतीने एक अर्थपूर्ण सहभाग राहीला आहे आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत एक वैयक्तिक आणि महत्त्वाची बातमी शेअर करू इच्छितो. मी तुमच्यापैकी काहींना ही बातमी आधीच शेअर केली आहे. लग्नाच्या १७ वर्षांनंतर आणि असंख्य आठवणींनंतर, नेहा आणि मी परस्पर वेगळे झालो आहोत आणि स्वतंत्रपणे आमचे आयुष्य सुरू करत आहोत. आम्ही कायदेशीर विभक्त सप्टेंबर २०२४ मध्येच दोघांच्या समंतीने झालो आहोत.

मी ही बातमी शेअर करण्यापूर्वी थोडा वेळ घेण्याचा निर्णय घेतला जेणेकरून खाजगीरित्या मला हे सगळं पचवणं शक्य होईल आणि सर्वकाही विचारपूर्वक केले जाईल याची खात्री होईल, विशेषतः आमच्या मुलीच्या रेणुकाच्या हिताच्या दृष्टीने. ती माझी सर्वोच्च प्राथमिक जबाबदारी आहे आणि मी नेहासोबत प्रेमाणे सह-पालकत्व करण्यास वचनबद्ध आहे.

हा आमच्यासाठी वैयक्तिकरित्या एक नवीन अध्याय सुरु होत असला तरी, पालक म्हणून आमचे नाते आणि एकमेकांबद्दलचा आमचा आदर कायम आहे.
या काळात तुम्ही दाखवलेली गोपनीयता, समजूतदारपणा आणि आदराची मी खरोखर प्रशंसा करतो. प्रेम आणि कृतज्ञतेसह,
राहुल."


अशा शब्दात राहूल यांनी त्यांच्या विभक्त होण्याची बातमी शेअर केली आहे. राहूल, नेहा आणि त्यांची चिमुकली रेणुका यांचे गोड व्हिडीओस नेहमीच सोशल मीडियावर पाहायला मिळायचे. रेणुकाच्या गोड व्हिडीओसना लाखो व्ह्यूज देखील मिळायचे.