पुरी रथयात्रेदरम्यान १५०० हून अधिक स्वयंसेवकांचे सेवाकार्य

    11-Jul-2024
Total Views | 21

RSS Sevakarya

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS Sevakarya) १५०० हून अधिक स्वयंसेवक महाप्रभू जगन्नाथाच्या रथयात्रेतील सेवाकार्यात गुंतले होते. उत्कल बिपन्ना सहायता समितीच्या वतीने स्वयंसेवकांनी जगप्रसिद्ध पुरी रथयात्रेदरम्यान १० प्रकारच्या सेवा दिल्या. यात विशेषतः गर्दीतील जखमी आणि बेशुद्ध भाविकांना रुग्णालयात नेण्यासाठी स्वयंसेवकांनी रुग्णवाहिकांकरिता ५०० मीटरचा रुग्णवाहिका कॉरिडॉर तयार केला होता.

हे वाचलंत का? : वक्फ बोर्डाची बंदी उठवण्याच्या मागणीखातर हजारो मुस्लिमांची निदर्शने!

यावेळी प्रथमोपचारासाठी ८ डॉक्टर्स, २ फार्मासिस्ट, २ सहाय्यक, २ रुग्णवाहिका सेवेत ४० स्वयंसेवक, ९ विविध स्ट्रेचर सेवेत ३६ स्वयंसेवक, १० ठिकाणी पिण्याचे पाणी वाटपासाठी ६० स्वयंसेवक, ५ ठिकाणी पिण्याचे पाणी वाटपासाठी २० स्वयंसेवक, १४ मशीनद्वारे पाणी फवारणीसाठी ४२ स्वयंसेवक, रुग्णालयातील ३५० रुग्णांना मदत करण्यासाठी २५ स्वयंसेवक, १० स्वच्छता गटांद्वारे १५० स्वयंसेवक, भोजन वितरणासाठी ६० स्वयंसेवक आणि रुग्णवाहिका कॉरिडॉरसाठी १०५९ स्वयंसेवक कार्यतत्पर होते.


RSS Sevakarya

दि. ७ व ८ जुलै असे दोन दिवस स्वयंसेवक सकाळपासून संध्याकाळपर्यंत अखंड सेवाकार्यात सहभागी झाले होते. २००५ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक प्रशासनाच्या सहकार्याने सेवाकार्य करत आहेत. या १० प्रकारच्या सेवांपैकी ९ दिवसांच्या दीर्घ कालावधीसाठी प्रथमोपचार प्रदान केले जात आहेत. ६ जुलै रोजी सायंकाळी स्थानिक सरस्वती शिशु विद्या मंदिर, घोडा बाजार येथे संघाच्या अधिकाऱ्यांनी १० भागात सर्व स्वयंसेवकांना सेवेचे महत्त्व समजावून सांगितले. ७ जुलै रोजी सकाळी ७ वाजता गुंडीचा मंदिराजवळ सेवेचा शुभारंभ झाल्यानंतर रथयात्रेत ही सेवा देण्यात आली.


अग्रलेख
जरुर वाचा
मुंब्रा रेल्वे दुर्घटनेबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे रेल्वे विभागाला खडेबोल! विचारले... या घटनेची जबाबदारी कुणाची?

मुंब्रा रेल्वे दुर्घटनेबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे रेल्वे विभागाला खडेबोल! विचारले... या घटनेची जबाबदारी कुणाची?

मुंब्रा लोकल स्थानकाजवळ ९ जून रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास दुर्घटना घडली होती. दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना लोकलच्या दारात लटकलेल्या प्रवाश्यांच्या बॅगा घासल्यामुळे ६ प्रवाशांचा रेल्वे रुळावर पडून मृत्यू झाला होता. या घटनेवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवार दि. १९ जून रोजी प्रवाशांच्या मृत्यूंबाबत एका जनहित याचिकेवर सुनावणी करत असताना चिंता व्यक्त केली आणि मध्य रेल्वेने मुंबई लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित बंद दरवाजे बसवण्याचा विचार करावा, असा सल्ला दिला...

क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे नवी मुंबईसाठी पुनर्विकास प्रदर्शनाचे आयोजन

क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे नवी मुंबईसाठी पुनर्विकास प्रदर्शनाचे आयोजन

नवी मुंबई आणि रायगड भागातील गृहनिर्माण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या पहिल्याच उपक्रमात चाळीस वर्षांखालील तरुण रिअल इस्टेट डेव्हलपर्सची संघटना, क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे सिडको Exhibition सेंटर रविवार, २९ जून २०२५ रोजी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 8:00 वाजेपर्यंत मेगा पुनर्विकास प्रदर्शन योजले आहे. आज नवी मुंबईतील हॉटेल ताज विवांता येथे रिअल इस्टेट उद्योगातील वरिष्ठ नेते, क्रेडाई एमसीएचआय युथचे पदाधिकारी आणि माध्यमांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121