अभाविपचा ७६ वा स्थापना दिवस दिमाखात झाला साजरा

    10-Jul-2024
Total Views |

ABVP Delhi

मुंबई (प्रतिनिधी) : (ABVP foundation day Delhi) 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिल्लीतील जिल्ह्यांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून दि. ८ जुलै आपला स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. याप्रसंगी अभाविपने दिल्लीतील ४४ जिल्ह्यांसाठी कार्यकारिणी तयार करण्यात आली. दरम्यान जवाहरलाल नेहरू विद्यापीठात संगीत संध्या आणि दिल्ली विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांमध्ये रक्तदान, वृक्षारोपण आणि परिसंवाद यासारख्या विविध सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

हे वाचलंत का? : 'अभी तो करबला का आखिरी मैदान बाकी है...'; शांतीदुतांना भडकवण्याचा धर्मांधांचा डाव

अभाविपने आपला ७६ वा स्थापना दिवस देशभरात विविध कार्यक्रमांसह साजरा केला. वेगवेगळ्या ठिकाणी अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. जेएनयूमध्ये आयोजित एका संगीत संध्या कार्यक्रमात विद्यार्थी आणि कलाकारांनी आपल्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. दिल्ली विद्यापीठात, विद्यार्थी आणि स्थानिक रहिवाशांच्या सक्रिय सहभागाने रक्तदान मोहीम, वृक्षारोपण मोहीम आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.