पैशाच्या वादातून मौलानाची हत्या; कट्टरपंथीयांची पोलिसांवर दगडफेक

    09-Jun-2024
Total Views |
 Maulana
 
लखनौ : उत्तर प्रदेशातील प्रतापग जिल्ह्यात शनिवार, दि. ७ जून २०२४ मदरशातील एका मौलानाची हत्या करण्यात आली. फारुख असे ६० वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे. मौलानाने आरोपीकडून घेतलेले पैसे परत न केल्याचा राग हे खुनाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. हत्येनंतर मृत मौलानाच्या समर्थनार्थ जमावाने पोलिसांवर हल्ला केला. गावात दगडफेक झाली. हा जमाव आरोपीच्या घरात घुसण्याच्या बेतात होता. पोलिसांनी मोठ्या प्रयत्नाने हिंसक जमावाला नियंत्रणात आणले.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना प्रतापगडमधील जेठवारा पोलीस स्टेशन परिसरात घडली. मौलाना फारुख हे येथील सोनपूर गावात राहत होता. थोड्याच अंतरावर असलेल्या मौहर नावाच्या गावात तो मदरसा चालवत होता. मौलानाचा त्याच्याच गावातील काही लोकांशी पैशांवरून वाद सुरू होता. मौलाना शनिवारी पुन्हा गावात आला. यावेळी आरोपीने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. फारुखने समाधानकारक उत्तर न दिल्याने आरोपीने त्याच्याशी हाणामारी सुरू केली. या हाणामारीत मौलानाचा जागीच मृत्यू झाला.
 
हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. याप्रकरणी एका महिलेसह एकूण ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार असून त्यांना शोधण्यासाठी पोलिस छापे टाकत आहेत. पोलीस आपले काम करत असताना अचानक मौलानाच्या समर्थनार्थ जमाव जमू लागला. पोलिसांनी समजावल्यानंतरही या सर्वांनी रास्ता रोको करण्यास सुरुवात केली.
 
पोलिसांनी रस्तारोको हटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा जमावाचा पोलिसांशी वाद झाला. जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. जमावातील काही लोकांनी आरोपीच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त पोलिस दलाची पथके पाचारण केली. गावातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाच पीएसी कंपन्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत.