कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची कडक भूमिका, तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

    27-Jun-2025   
Total Views |

कोलकाता : (Kolkata Rape Case)
दक्षिण कोलकाता येथील कसबा परिसरात असणाऱ्या साऊथ कोलकाता लॉ कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर कॉलेज कॅम्पसमध्येच सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची. पीडितेच्या तक्रारीवरुन कसबा पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. कोलकाता येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेची राष्ट्रीय महिला आयोगा (NCW)ने स्वतःहून दखल घेत तीन दिवसांत कारवाई अहवाल मागवला आहे.

या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाने घटनेची तातडीने स्वतःहून दखल घेत एक निवेदन जारी केले. ज्यात महिला आयोगाने म्हटले आहे की, "एका कायद्याच्या विद्यार्थिनीवर महाविद्यालयाच्या आवारात दोन विद्यमान विद्यार्थी आणि एका माजी विद्यार्थ्याने सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या घटनेबाबत अध्यक्षा विजया रहाटकर यांनी कोलकाता पोलिस आयुक्तांना पत्र लिहून गंभीर चिंता व्यक्त केली आहे आणि BNS च्या संबंधित तरतुदींनुसार तात्काळ, कालबद्ध चौकशीचे निर्देश दिले आहेत. BNSS च्या कलम ३९६ अंतर्गत पीडितेला संपूर्ण वैद्यकीय, मानसिक आणि कायदेशीर मदत देण्याबरोबरच भरपाई देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली आहे. आयोगाने ३ दिवसांच्या आत सविस्तर कारवाईचा अहवाल मागितला आहे," असे राष्ट्रीय महिला आयोगाने निवेदनात म्हटले आहे.

घटनेवर लॉ कॉलेजच्या प्रशासनाने अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. आता पुन्हा एकदा एका कॉलेजच्या आवारात अशा प्रकारची घटना घडल्याने सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेबाबत राज्य सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.






अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\