देशात इस्लामिक शासन आणण्याचा पीएफआयचा चारकलमी कार्यक्रम - एनआयएच्या दोषारोपपत्रात धक्कादायक खुलासा

    27-Jun-2025   
Total Views | 28

नवी दिल्ली, देशातील मुस्लिमांना एकाच झेंड्याखाली आणणे, राजकीय पक्षाद्वारे समाजात फूट पाडणे आणि एसडीपीआयला देशातील मुस्लिमांचे प्रतिनिधीत्व करणारा एकमेव पक्ष बनवणे असा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) कट असल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) दोषारोपपत्रात स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) स्वयंसेवक श्रीनिवासन यांच्या हत्येचा तपास एनआयए करत आहे. याप्रकरणी पीएफआयवर बंदीदेखील घालण्यात आली आहे. एर्नाकुलम न्यायालयात एनआयएने दोषारोपपत्र दाखल केले आहे. एनआयएने न्यायालयाला सांगितले की, बंदी घातलेल्या पीएफआय या संघटनेचे सदस्य आणि अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून एका मोठ्या कटात सहभागी होते. त्यांचा उद्देश २०४७ पर्यंत देशात दहशत पसरवणे, सांप्रदायिक तणाव वाढवणे आणि भारतात इस्लामिक राजवट लादणे हा आहे.

एनआयएच्या मते, पीएफआयचे सदस्य यापूर्वी सिमीसारख्या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंधित होते. त्यांचे लष्कर-ए-तोयबा, आयसिस आणि अल-कायदासारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशीही संबंध आहेत. संघटनेचे अनेक कार्यकर्ते या दहशतवादी संघटनांचे सदस्य राहिले आहेत. केरळसह देशाच्या अनेक भागात पीएफआयच्या लोकांनी हिंसाचार आणि खून केले, ज्यामुळे सामान्य लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. एनआयएचा दावा आहे की पीएफआय केवळ दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत नव्हता, देशात अनेक ठिकाणी शस्त्रसाठा करण्याचीही योजना होती.

पीएफआयचे असे होते ४ टप्पे

1. पहिल्या टप्प्यात मुस्लिम समुदायाला एका झेंड्याखाली आणणे, त्यासाठी एसडीपीआय या पक्षाची स्थापना.

2. दुसऱ्या टप्प्यात एसडीपीआय या राजकीय पक्षाच्या माध्यमातून, दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांना एकत्र आणणे आणि निवडणूका लढवणे.

3. तिसऱ्या टप्प्यात समाजात फूट निर्माण मतपेढीच्या राजकारणाद्वारे सत्ता प्राप्त करणे.

4. चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात देशातील अन्य मुस्लिम संघटनांना बाजुला ठेवून केवळ



'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121