पुण्यात आजपासून त्रीदिवशीय राम कथा सोहळा

    07-Jun-2024
Total Views |

रामायण 
 
मुंबई : रा. ची. ढेरे संस्कृती संशोधन केंद्रातर्फे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम पुण्यात होत असतात. त्याच अनुषंगाने दि. ७, ८ आणि ९ जून रोजी तीन दिवस विविध रामकथांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. रा. ची. ढेरे सांस्कृतिक संशोधन केंद्रातर्फे आयोजित केलेला हा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह टिळक रस्ता पुणे येथे संपन्न होत आहे. पहिले व्याख्यान शुक्रवारी तमिळनाडूची कंब कवींची रामकथा आहे तर शनिवारी दुसरे व्याख्यान महाकवी पंप यांचे रामायण आहे. रविवारी तिसरे व अखेरचे रामायण काश्मिरी रामायणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
 
आज दिनांक सात जून रोजी शुक्रवारी संध्याकाळी सहा ते साडेसात वाजता तमिळनाडूची कंब कवींची रामकथा सादर होणार आहे. शनिवारी महाकवी पंप यांचे रामायण व त्या दिपाली पाटवदकर सादर करणार आहेत. तर तिसरे व्याख्यान रविवारी सकाळी 10 ते 11:30 दरम्यान काश्मिरी रामायणावर डॉ. सुनील गोंधळेकर यांचे आयोजित करण्यात आले आहे.