हाॅटेलमध्ये पाळले होते कासव; महाबळेश्वरमध्ये हाॅटेल मालकावर वन विभागाची कारवाई

    11-Jun-2024
Total Views |
mahabaleshwarमुंबई (प्रतिनिधी) - महाबळेश्वरमधील एका हाॅटेलमध्ये पाळलेले भारतीय प्रजातीचे कासव वन विभागाने कारवाई करत सोमवार दि. १० जून रोजी ताब्यात घेतले (indian softshell turtle). या प्रकरणी हाॅटेल मालकाला अटक करण्यात आली आहे. (indian softshell turtle)

महाबळेश्वर-तापोळा मार्गावरील निलमोहर अॅग्रो रिसाॅर्टमधील फिश टॅंकमध्ये इंडियन साॅफ्टशेल प्रजातीचे कासव पाळल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. 'इंडियन साॅफ्टशेल' प्रजातीचे कासव हे 'भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत प्रथम श्रेणीत संरक्षित आहे. म्हणजेत त्याला वाघाएवढे संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे या प्रजातीचे कासव किंवा कोणतेही कासव पाळणे किंवा त्याची खरेदी-विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. अशा परिस्थितीत 'निलमोहर अॅग्रो रिसॉर्ट'मध्ये 'इंडियन साॅफ्टशेल' प्रजातीचे कासव पाळण्यात आले होते. वन विभागाने हाॅटेलवर धाड टाकून कासव ताब्यात घेतले. हाॅटेलचे मालक आरोपी विजय शिंदे यांना अटक करुन त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कारवाई महाबळेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे, वनपाल अर्चना शिंदे, सहदेव भिसे, वनरक्षक अभिनंदन सावंत, लहू राऊत, विलास वाघमारे, संदीप पाटोळे, रेश्मा कांवळे, मिरा कुटे, श्रीनाथ गुळवे, विश्वंभर माळझळकर यांनी केली.