शपथग्रहण सोहळ्यानिमित्त लाडूवाटप

    10-Jun-2024
Total Views |

लाडू वाटप
 मुंबई: भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी यांनी रविवार, दि. 9 जून रोजी पंतप्रधानपदाची तिसर्‍यांदा शपथ घेण्याचा मान मिळवला आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी माजी आमदार अतुल शाह यांनी नरेंद्र मोदी यांच्या शपथग्रहण सोहळ्यानिमित्त रविवार, दि. 9 जून रोजी यांनी त्यांच्या डंकन रोड येथील कार्यालयातून संध्याकाळी 5 वाजल्यापासून लाडूवाटपाला सुरुवात केली.
 
त्यांच्याहस्ते लाडूवाटप गोल देऊळ, दुसरा कुंभारवाडा दुर्गादेवी स्ट्रीट, दुर्गादेवी चौक, चौथा कुंभारवाडा, पुढे पट्टे बापूराव मार्ग गुलालवाडी तसेच सीपी टँक सर्कल तेथून बीपी रोड करून अद्रेसर दादी स्ट्रीट परिसर येथे दहा हजार बुंदीचे लाडू विभागीय नागरिकांना वाटण्यात आले. यावेळी विभागीय जनतेत प्रचंड आनंद होता. त्यांनी उत्स्फूर्तपणे या लाडूवाटप कार्यक्रमात सहभागी होऊन ‘फिर एक बार मोदी सरकार, तिसरी बार मोदी सरकार’च्या घोषणेने विभाग दणाणून सोडला.
 
यावेळी शिवशंकर शुक्ला, रोनक करेलीया, स्वातीबेन दमानिया, शीला इंजमुरी, सुंदरीबेन चौरसिया, संदीप मांजरेकर, संदीप तोतरे, जयंत आचरेकर, प्रकाश सोनी, बलवंत गायकवाड, अनुराग चौरसिया, मुकेश गावकर, अनिल सुर्वे, राजा, रफिक शेख, वासुदेव चौरसिया, राकेश वासुदेव, पप्पू भाई चौरसिया, रुपचंद चौरसिया आदी मान्यवर उपस्थित होते.