संगीत नाटक अकादमीच्या स्थापनदिनानिमित्त दिल्लीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन

    01-Jun-2024
Total Views |
 
sandhya purecha
 
मुंबई : भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालयाने संगीत नाटक अकादमीच्या स्थापना दिनानिमित्त संगीत नाटक अकादमी नृत्य नाट्य व संगीत नवी दिल्ली यांच्या प्रित्यर्थ प्रतिज्ञा हा कार्यक्रम प्रस्तुत केला होता. हा कार्यक्रम संगीत नाटक अकादमीच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून दिनांक 31 मे 2024 रोजी संध्याकाळी सहा वाजता मेघदूत थिएटर थ्री रवींद्र भवन कोपर्निकस मार्ग नवी दिल्ली येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाला नंदिनी रामाने तसेच अनवरखान मंगानियार यांची विशेष व्याख्याने आयोजित केली होती. दिल्लीतील मान्यवर मंडळी या कार्यक्रमास उपस्थित होती तर रसिक सुद्धा मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा संध्या पुरेचा यांनी याबाबतची काही छायाचित्रे आपल्या सोशल मीडियावरून प्रसिद्ध केली आहेत.