मनोज वाजपेयींच्या 'भैय्याजी'चा पॉवर पॅक ट्रेलर भेटीला

    09-May-2024
Total Views |

bhaiya ji 
 
मुंबई : अभिनेते मनोज वाजपेयी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपली ओळख स्वकर्तृत्वाने निर्माण केली. आजवर अनेक विविधांगी भूमिका साकारुन त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. लवकरच मनोज वाजपेयींचा १०० वा चित्रपट ‘भैय्याजी’ (Bhaiya Ji Movie Trailer) प्रदर्शित होणार असून ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.
 
'भैय्याजी' च्या ट्रेलरची सुरुवात ती दोन व्यक्तींमधला संवादाने. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला भैय्याजी कोण आहे हे सांगत असतो आणि मग मनोज वाजपेयींची एन्ट्री होते. ट्रेलर पुढे जात असताना समजतं की मनोज वाजपेयींच्या भावाचा खून केला असतो. आणि आपल्या भावाच्या खुनाचा ते बदला घेत असतात. आता तो बदला कसा घेणार हे पाहण्यासाठी चित्रपट पुर्ण पाहावा लागेल.
 
'भैय्याजी' हा मनोज वाजपेयींच्या अभिनय कारकीर्दीतला १०० वा चित्रपट आहे. देसी सुपरस्टार अशी ओळख मिळवणाऱ्या मनोज वाजपेयींचं नाव घेतलं की 'गँग्ज ऑफ वासेपूर' आठवणार नाही असं होणे शक्य नाही. 'भैय्याजी' २४ मे रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.