विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा 'अवघे गर्जे पंढरपूर'!

    26-Jun-2025   
Total Views | 9



only thunderous pandharpur



मुंबई : देवशयनी आषाढी एकादशीचा शुभमुहूर्त साधत अखंड विठ्ठलमय वातावरणात रसिक भक्तांना भक्तिरसात न्हालवणारा एक आगळावेगळा संगीत सोहळा 'अवघे गर्जे पंढरपूर' रंगणार आहे रविवार, ६ जुलै २०२५ रोजी दुपारी ४:०० वाजता, शिवाजी मंदिर, दादर येथे आयोजित करण्यात आला आहे.

भगवंत प्राप्ती हेच मानवी जीवनाचे साध्य असून त्याची प्राप्ती झाल्यानंतर बाकी काहीच शिल्लक राहात नाही. कर कटावरी असलेल्या त्या सावळ्या विठ्ठलाचे समचरण पाहिले की परत फिरणे नाही. त्या माय बापाच्या दर्शनाला देश परदेशाच्या सीमा ओलांडून लाखो भाविक विठ्ठल नामाचा जयघोष करत वारीत चालत येतात.भक्ती आणि वारीच्या गजरात दुमदुमणारा जयघोष अनुभवण्यासाठी प्रत्यक्ष वारीत जाण्याची आपली संधी हुकली असेल तर हा अनुभव गायनातून घडविण्यासाठीच 'एएसके' व 'दर्शन क्रिएशन्स' आणि 'अद्वैत थिएटर्स' यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राहुल भंडारे, समीर बापर्डेकर आणि अभिजीत जोशी यांच्या संकल्पनेतून सादर होणाऱ्या 'अवघे गर्जे पंढरपूर' या कार्यक्रमातून घेता येणार आहे. अथांग भक्ति सागरात टाळ-मृदंगाच्या गजरात रसिकांना हा कार्यक्रम विठ्ठलमय करणार असून या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रायोजकत्व एम. के. घारे ज्वेलर्स, लोकमान्य मल्टिपर्पज को - ऑप. सोसायटी, मिनी मॅक्स ऍड्स प्रा. लि. ने स्वीकारले आहे.

या कार्यक्रमात 'संगीत संन्यस्त खड्ग', 'संगीत हाच मुलाचा बाप', 'संगीत एकच प्याला' इत्यादी नाटकांमधील आघाडीची अभिनेत्री अर्थात प्रसिद्ध गायिका संपदा माने, गायक श्रीरंग भावे, नचिकेत देसाई आणि स्वरा जोशी हे गुणी गायक-गायिका आपले सुरेल गायन सादर करतील. या भक्तिरसपूर्ण गायनाला संगीत संयोजक कमलेश भडकमकर यांचे संगीत लाभणार असून, रसिकांची भक्तीची वाट आणखीनच अर्थपूर्ण करणारे निवेदन दीपाली केळकर यांच्या ओघवत्या शैलीतील आवाजातून साकारले जाणार आहे.

'अवघे गर्जे पंढरपूर' हा कार्यक्रम केवळ एक संगीत सादरीकरण नसून, तो एका आध्यात्मिक अनुभूतीचा जागर आहे. अशा या पवित्र संगीतमय यात्रेचा लाभ घेण्यासाठी आणि विठुरायाच्या भक्तीने अंत:करण भरून टाकण्यासाठी, प्रत्येक भक्ताने ६ जुलै २०२५, रविवार, दुपारी ४ वाजता, शिवाजी मंदिर, दादर येथे उपस्थित राहून या सशुल्क कार्यक्रमाला भरभरून दाद द्यावी.

अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121