मोठी दुर्घटना! गुजरातमध्ये महिसागर नदीवरील पूल कोसळला; अनेक वाहनं नदीत पडली, ९ जणांचा मृत्यू

    09-Jul-2025   
Total Views | 51

गांधीनगर : (Vadodara Bridge Collapse) गुजरातच्या वडोदरा आणि आणंद जिल्ह्याला जोडणारा महिसागर नदीवर असलेल्या गंभीरा पूलाचा काही भाग कोसळल्याने अपघाताची घटना घडली आहे. हा अपघात बुधवारी ९ जुलैला सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातादरम्यान वाहनांची वर्दळ सुरू असल्याने काही वाहनं थेट महिसागर नदीत पडली आहेत. या घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून इतर काही नागरिक नदीपात्रात अडकल्याची शक्यता असल्यामुळे शोधमोहिम आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे.


गुजरातच्या पड्रा तालुक्यातील मुजपूर येथे हा पूल होता. दोन ट्रक, एक बोलेरो जीप, दुसरी एक गाडी पूल ओलांडत असताना अचानक पूलाचा एक भाग कोसळला. त्यामुळे दुथडी भरुन वाहणाऱ्या महिसागर नदीत ही चारही वाहनं कोसळली. हा पूल कोसळल्याच्या घटनेचे काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये एक टँकर कोलमडलेल्या पूलावरून खाली पडताना लटकलेल्या अवस्थेत दिसत आहे.


या घटनेनंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक आणि एनडीआरएफचे पथक दाखल झाले असून बचाव कार्य सुरु आहे. तसेच ही घटना घडली तेथे नदीचा सर्वात खोल भाग नसल्यामुळे बचावकार्य वेगाने सुरु आहे. तसेच या घटनेतील मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्यात येत आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी धामेलिया यांनी सांगितली.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121