'संधीचं सोनं करणं म्हणजे...' नम्रता संभेरावचं काम पाहून भारावला ‘हा’ अभिनेता

    08-May-2024
Total Views |

namrata  
 
 
मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री नम्रता संभेराव सध्या ‘नाच गं घुमा’ (Nach Ga Ghuma) या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटात तीने मोलकरणींचे प्रतिनिधीत्व करणारी व्यक्तीरेखा (Nach Ga Ghuma) साकारली आहे. तिच्या या भूमिकेचे सर्वच स्तरांतून कौतुक होत असताना रंग माझा वेगळा मालिका फेम अभिनेता आशुतोष गोखले याने नम्रताचे कौतुक करणारी विशेष पोस्ट केली आहे.
 
आशुतोषने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये 'नाच गं घुमा'चे एक पोस्टर शेअर केले आहे आणि लिहिले की, 'मिळालेल्या संधीचं सोनं करणं म्हणजे काय हे ती संधी शोधू पाहणाऱ्या प्रत्येक कलाकाराने नम्रता संभेराव हिचं "नाच गं घुमा" चित्रपटामधलं काम बघून शिकावं. नम्रता ही एक चांगली अभिनेत्री आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. पण एखाद्या कामाचं, व्यक्तिरेखेचं आणि प्रामुख्याने मिळालेल्या त्या एका संधीचं मोल असणं म्हणजे काय हे तिने केलेल्या कामात जो खरेपणा, जो प्रामाणिकपणा आहे त्यातून जाणवत राहतं.'
 

namrata  
 
परेश मोकाशी दिग्दर्शित 'नाच गं घुमा' चित्रपटात मुक्ता-नम्रता यांच्यासह सारंग साठ्ये, सुप्रिया पाठारे, सुकन्या मोने आणि बालकलाकार मायरा वायकुळ अशी स्टारकास्ट आहे. हिरण्यगर्भ निर्मित हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित झाला होता. आत्तापर्यंत या चित्रपटाने ८ कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर पार केला आहे.