अक्षय जोग यांच्या 'दुर्लक्षित हिंदुहितवादी - व्यक्ती, संस्था आणि चळवळी' पुस्तकांची नोंदणी सुरु

    17-May-2024
Total Views |

akshay jog book 
 
मुंबई : भारतीय विचार साधना प्रकाशित सावरकर अभ्यासक आणि सुप्रसिद्ध लेखक अक्षय जोग यांच्या 'दुर्लक्षित हिंदुहितवादी - व्यक्ती, संस्था आणि चळवळी' पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरु झालेली आहे. या पुस्तकांतनेमक्या कोणत्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे आणि प्रकाशनपूर्व पुस्तक मागवल्यास काय सवलतीत मिळेल याविषयी लेखक अक्षय जोग यांनी माहिती दिली.
 
या पुस्तकात मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे अपरिचित शुध्दीकार्य म्हणजे घरवापसी कार्य, समाजसुधारक आणि बुद्धीवादी गोपाळ गणेश आगरकर यांचे दुर्लक्षित हिंदुहितवादी विचार, हिंदूराष्ट्र संकल्पनेची सविस्तर मांडणी करणाऱ्या राजनारायण बसु यांच्यावरील दीर्घलेख, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे राष्ट्रवादावरील जहाल विचार, प्रखर आणि कट्टर राष्ट्रवादी विचार मांडणारे नवगोपाळ मित्र, देवेंद्रनाथ आणि द्विजेंद्रनाथ या ठाकूर पिता - पुत्रांचे राष्ट्रवादावरील अपरिचित विचार आणि कार्य, हिंदु मेळा या अपरिचित संस्थेची सविस्तर माहिती, सावरकरांचा अपरिचित भागलपूर लढा, हिंदू हे स्वयमेव राष्ट्र आहे हे वाक्य डॉ हेडगेवारांच्या आधी कोणी उच्चारले होते यासारखी अनेक अपरिचित माहिती या ९० पृष्ठांच्या ग्रंथात सोप्या, सुटसुटीत पण संदर्भासह तसेच सामान्य वाचकाला कळेल अशा भाषेत वाचायला मिळेल.
 
पुस्तकाची मूळ किंमत ₹१५० इतकी आहे तर पुस्तक प्रकाशनपूर्व विशेष सवलतीत ₹१०० मध्ये प्राप्त होईल. तसेच घरपोच हवे असल्यास ₹५० कुरियर चार्जेस अधिकचे कथील. तर महाराष्ट्राबाहेर पुस्तक हवे असल्यास ₹१००. सदर पुस्तकाची पृष्ठसंख्या ९० इतकी आहे. पुस्तक हवे असल्यास इच्छूकांनी एकूण ₹१५० कुरियर चार्जेस सहित 9356969224 या नंबरवर Google pay, phone pay किंवा BHIM या अँपवरून पाठवावेत, तसेच UPI पेमेन्ट स्क्रीनशॉट, नाव, पत्ता, पिनकोड, कॉन्टॅक्ट नंबर वरील नंबरवर व्हॉटसअप करावे.
 
विशेष टीप: पुस्तक वितरण दिनांक २८ मे २०२४ पासून सुरु होईल याची नोंद घ्यावी.