'भारतमातेची लेकरे' आता हक्काने तिच्या कुशीत राहतील

निर्वासितांना मिळालेल्या नागरिकत्वावर आलोक कुमार यांचे प्रतिपादन

    17-May-2024
Total Views |

VHP-CAA

मुंबई (प्रतिनिधी) :
"पाकिस्तानात छळ झालेल्या आणि आपल्या धर्म, जीवन व शालीनतेच्या रक्षणासाठी भारतात आलेल्या ३०० निर्वासितांना भारतीय नागरिकत्व (VHP-CAA) मिळाले. हे स्वागतार्ह पाऊल आहे. आता हे सर्वजण, भारताचे नागरिक आणि भारतमातेची लेकरे, हक्काने भारत मातेच्या कुशीत राहतील.", असे मत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी व्यक्त केले. सीएए अंतर्गत बुधवारी १४ जणांना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आले. त्यावर आलोक कुमार यांनी विहिंपची भूमिका मांडली.

ते म्हणाले, ही भारताची परंपरा आहे. इतिहास साक्षी आहे की, जगाच्या कोणत्याही भागातून प्रताडित होऊन आलेल्या निर्वासितांना भारताने प्रेम, आदर आणि पाठिंबा देत भारतात स्थान दिले.

हे वातलंत का? : "कोणीही CAA हटवू शकत नाही, ही मोदींची गॅरंटी आहे"

ही श्रीरामाची परंपरा आहे. रामायणात विभीषण प्रभू श्रीरामाच्या छावणीकडे येत असताना सुग्रीवाने त्यांना पकडून बांधून ठेवण्याचा सल्ला दिला होता. पण त्यावेळी श्रीराम म्हणाले, "मम पन सरनागत भयहारी", म्हणजेच शरणागतीचे भय दूर करण्याचे माझे व्रत आहे.

विहिंपच्या कार्यकर्त्याना आवाहन करत पुढे ते म्हणाले, भारतात राहणाऱ्या सर्व हिंदू, शीख, जैन, बौद्ध निर्वासितांना मदत करणे आणि त्यांना भारतीय नागरिकत्व मिळवून देणे अपेक्षित आहे.