साहित्य कलांचे रसिक छत्रपती संभाजी राजे यांच्या बलिदानदिनानिमित्त त्यांच्या साहित्याचा घेतलेला आढावा

    08-Apr-2024
Total Views | 64

छत्रपती संभाजी  
 
आज संभाजी राजांचा बलिदान दिन. अत्यंत विदारक अवस्थेत त्यांना मृत्यूने ग्रासले. आपल्या नातेवाइकांच्याच खोडीने आपल्यावर ही स्थिती उद्भवणे घेणारे हे तत्वनिष्ठ हिंदुत्ववादी छत्रपती. शेवटपर्यंत धर्म बदलाच्या अटीवर जीवनदान देणाऱ्या पातशाहासमोर त्यांची मान अवनत झालीच नाही. या अत्यंत तेजस्वी आणि विलक्षण प्रतिभावंत राजाच्या साहित्यसेवेबद्दल मात्र म्हणावे तेवढे बोलले जात नाही. संस्कृतचे गाढे अभ्यासक असलेल्या संभाजींनी अवघ्या १४ व्या वर्षी बुधभूषण ग्रंथ लिहिला. तसे त्यांनी नायिकाभेद, नखशिखांत, बुधभूषण, सातशतक असे बरेच ग्रंथ लिहिले, संस्कृत रचना केल्या. परंतु अल्पवयात लिहिलेल्या बुधभूषण बद्दल आज सांगणार आहे.
 
आपल्या आजच्या साहित्यात अर्पणपत्रिका लिहायची रूढ पद्धत असते. त्यांनी त्यांच्या ग्रंथाच्या सुरुवातीला आपले वडील शिवाजी महाराज आणि आजोबा शहाजी राजे यांच्याविषयी स्तुतीपर पदे लिहिली आहेत.
 
वडिलांची म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती करताना ते लिहितात,
कलिकाल भुजं गमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं यः ।
जगत: पतिरं शतोवतापो: (तीर्ण:)स शिवछत्रपति जयत्यजेयः ॥
याचा अर्थ असा -"कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा,करितो धर्माचा ऱ्हास तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥
शहाजी राजे यांची स्तुती करताना लिहितात,
भृशबदान्वय सिन्धू सुधाकर: प्रथित कीर्ति रूदार पराक्रम:|
अभवतर्थकलासु विशारदो जगति शाहनृप: क्षितिवासव: ||
 
याचा अर्थ असा, सर्वशक्तिमान,सामर्थ्थवान असलेला पृथ्वीतलावरील सर्वश्रेष्ठ असा राजा किंवा प्रत्यक्ष शिवाचा अवतार असलेला उदार पराक्रमी आणि अर्थकारण व राजकारणातील धुरंदर अशा विविध गुणांचा संगम झालेला हा नृपथोर राजा गुणसागरातील चंद्राप्रमाणे शोभत होता. असे सिंधु सुधाकरासारखे प्रचंड पराक्रमी,कार्तिवान,उदार शहाजी राजे होऊन गेले.
 
त्यानंतर त्यांनी श्रीशंभूराजे उर्फ संभाजीराजे यांचे तसेच क्षत्रियकुलावतंस शिवछत्रपति यांचे सुबक रचले आहे. त्याचा अर्थ अनुक्रमे असा, अशा त्या थोर शिवप्रभूंच्या समस्त मांडलिकामध्ये शिरोभूषण म्हणून शोभणारा आत्मज (आत्मन्चा अंश) शंभू(राजा)म्हणून प्रसिद्धीस आला.तो काव्य, साहित्य, संगीत,धनुर्विद्या इ.चा कलासागर पार केलेला होता. व शिवछत्रपतींच्या सुबकचा अर्थ , ज्यांनी वैर करणाऱ्या महिपालांची (अनेक राजांची)गर्वोन्मत मस्तके (मुंडमाला) विश्वंभरास अर्पण केली,अशा वसुंधरेस गवसणी घालणाऱ्यांमध्ये,उत्तुंग व श्रेष्ठ असणाऱ्या,पुत्र 'शिव'म्हणून पुराणांतरींचा प्रभु(अंशावतार?)जन्मास आला.त्या शहाजीराजांना,महाशूर मुलखाचे धनी असलेले,लोकांना पर्वतासारखे(हिमालय)उत्तुंग म्होरके वाटणारे,पुराणातील पुरूषश्रेष्ठ,शिवासारखे राजे शिवाजी हे श्रेष्ठ पुत्र झाले.
हा राज्यानितीशास्त्रपर ग्रंथ शिवाजी महाराज यांच्या सोबत वाढल्याने रचला असावा. जिजाऊ आजीसारखी सावलीसारखी त्यांच्या पाठीशी असे त्याचाच हा परिणाम. या ग्रंथात एकूण तीन अध्याय आहेत यात राजनीती,राज्य व्यवस्था,कर्तव्ये,मंत्रिमंडळ इत्यादी प्रकरणे आहेत. छत्रपती संभाजी राजांनी शंभूराज, नृपशंभू,शंभूवर्मन या नावानी साहित्य निर्मिती केली या महान छत्रपतींना अनेक भाषा बोलता आणि लिहिताही येत होत्या. त्यांचे संकृत दानपत्र प्रसिद्ध आहे, ब्रज भाषेतील सातसतक,नखशिख,नायिकाभेद हे ग्रंथ उपलब्ध आहेत. श्रुंगारपुरच्या निसर्गरम्य वातावरणात त्यांनी श्री सखी राज्ञी जयती महाराणी छ.येसुबाईसाहेब यांच्या प्रेरणेने त्यांनी 'नखशिखा' हा ग्रंथ लिहिला. मुंबई विकत घेण्याच्या संबंधीचा पूर्ण व्यवहार हा इंग्रजीतून संभाजीराजांनी केलेला. स्वराज्याचे हे दुसरे अभिषिक्त छत्रपती मराठीसह संस्कृत,फारसी,उर्दु,अरबी,ब्रज, इंग्रजी यांसारख्या अनेक भाषांचे जाणकार होते. इंग्रजीतुन त्यांनी अनेकदा फिरंग्यांशी बोलणी व पत्रव्यवहार केला. अतिशय हुशार, कर्तबगार, दुरदरषी, अनेक विद्या व कलांचे अधीपती व सर्वगुणसंपन्न असेच धाकल्या छत्रपतींचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या मृत्यूच्या वेळीही त्यांचे साहित्य विश्वातील मित्र कवी कलश उर्फ कविराज त्यांच्या समवेत होते. छत्रपतींनी सोसले तेवढेच शारीरिक छळ त्यांनीही विना तक्रार सोसले. या राजांचा आज बलिदान दिन. या विलक्षण व्यक्तिमत्वाच्या स्मृतींस विनम्र अभिवादन!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121