"राऊत तुम्हाला बाळासाहेबांनी जोड्यानं हाणलं असतं"

ज्योती वाघमारेंनी संजय राऊतांना सुनावले खडेबोल

    19-Apr-2024
Total Views |
jyoti
 
मुंबई : संजय राऊत यांनी भाजपच्या अमरावती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नवनीत राणा यांच्यावर खालच्या थराला जाऊन टिका केली होती. त्यावर शिवसेनेच्या नेत्या डाँ. ज्योती वाघमारे यांनी संजय राऊत यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट करत त्यांनी संजय राऊतांना खडेबोल सुनावले आहेत. आज जर बाळा साहेब असते तर राऊतांना जोड्यानं हाणलं असतं असं त्या यावेळी म्हणाल्या.
 
एखाद्या महीलेबद्दल इतक्या खालच्या थराला जाऊन टिका संजय राऊतांनी केली. हे हा महाराष्ट्र खपवुन घेईल का ? असा सवाल त्यांनी विचारला आहे. जिजाऊ, सावित्री आणि रमाईच्या महाराष्ट्रात महीलांचा असा अपमान होताना उद्धव ठाकरे गप्प का आहेत असा सवालही त्यांनी विचारला आहे. ज्योती वाघमारेंनी यावेळी सुषमा अंधारे यांचाही समाचार घेतला आहे.
 
हिंदु देवतांचा अपमान करणाऱ्या, आई बसली अस म्हणत अचकटविटकट हावभाव करणाऱ्या आणि महीला सन्मानाच्या गोष्टी करणाऱ्या सुषमा अंधारे आता कुठे आहेत असा सवालही ज्योती वाघमारे यांनी उपस्थित केला आहे. यावेळी शरद पवार आणि सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे मुग गिळुन का बसल्या आहेत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
 
रावण सुद्धा विद्वान होता पण त्याची सोन्याची लंका सितामाईचा अपमान केल्याने जळुन खात झाली. हस्तिनापुरचे साम्राज्यही द्रौपदीच्या अपमानामुळे धुळीस मिळाले. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीची लंका ही सुद्धा संजय राऊतांच्या बेताल वकत्यव्यामुळे जळुन जाणार आहे. कारण महाराष्ट्र महीलांचा अपमान सहन करणार नाही असंही पुढे ज्योती वाघमारे यांनी म्हटलं आहे.