राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त पहिले श्री शिवचरित्र साहित्य संमेलन

    17-Apr-2024
Total Views |
 
shivasammelan
 
मुंबई : श्री शिवराज्याभिषेक 350 वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालय आणि इतिहास प्रबोधन संस्था महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वातले पहिले 'श्री शिवचरित्र साहित्य संमेलन' दिनांक 26 जून ते दिनांक 29 जून असे चार दिवस नूतन मराठा महाविद्यालयाचे प्रांगण जळगाव येथे संपन्न होणार आहे. यावेळी सातारा, तंजावर, नागपूर गादीचे वारस संमेलनास उपस्थित राहणार असून पंच्याहत्तर सरदार घराणे आणि असंख्य मावळे येणार आहेत. तसेच जागतिक स्तरावरील शिवचरित्र अभ्यासकांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी या संमेलनात शस्त्र प्रदर्शन नाणी प्रदर्शन चित्र प्रदर्शन पुस्तक प्रदर्शन शस्त्र प्रशिक्षण शाहिरी पोवाडे जागरण गोंधळ कवी संमेलन असे अनेक कार्यक्रम होणार आहेत.
 
संमेलनाचे निमंत्रक प्राचार्य डॉक्टर लक्ष्मणराव देशमुख, नियंत्रक रवींद्र पाटील सचिव भारती साठे अध्यक्ष विनय डांगे हे आहेत.