शिवसेनेकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर!

    28-Mar-2024
Total Views |
Shivsena Loksabha Candidates List


मुंबई :    आगामी लोकसभा निवडणूक २०२४ करिता शिवसेना उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत एकूण ८ जागांवरील उमेदवारांची नावे शिवसेनाकडून जाहीर करण्यात आली आहेत. राज्यात महायुतीमधील भाजपकडून २४ उमेदवारांची यादी याआधीच जाहीर केली होती. त्यानंतर आता शिवसेनेकडून आपल्या महत्त्वाच्या जागांवर आपली उमेदवारी जाहीर केली आहे.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली, नाशिक, यवतमाळ-वाशिम येथील उमेदवारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीबाबत अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे आता जाहीर करण्यात आलेल्या शिवसेनेच्या पहिल्या यादीतील उमेदवारांची मतदारसंघनिहाय नावे पुढीलप्रमाणे :-

राजू पारवे - रामटेक

श्रीरंग बारणे - मावळ

राहूल शेवाळे - दक्षिण मध्य मुंबई

धैर्यशील माने - हातकणंगले

सदाशिव लोखंडे - शिर्डी

संजय मंडलिक - कोल्हापूर

हेमंत पाटील - हिंगोली

बुलढाणा - प्रतापराव जाधव