बिटकॉइनमध्ये २०२१ नंतर प्रथमच लक्षणीय वाढ

सिंगापूर येथे क्रिप्टोकरन्सी बीटकॉइनची ५०००० डॉलरने किंमत वाढली

    13-Feb-2024
Total Views |
Bitcoin   
 
 
 
बिटकॉइनमध्ये २०२१ नंतर प्रथमच लक्षणीय वाढ
 

सिंगापूर येथे क्रिप्टोकरन्सी बीटकॉइनची ५०००० डॉलरने किंमत वाढली
 

मुंबई: बिटकॉइनमध्ये दोन वर्षांनंतर वाढ झाली आहे. यावेळी बिटकॉइनमध्ये वाढ ५०००० डॉलर ( सुमारे ४१५०२५० रूपये) झाली असून बिटकॉइने बाजारात पुनरागमन केले आहे असे म्हणायला वाव आहे.याआधी बिटकॉइनने किंमतीत उसळी मारत ५०३७९ डॉलर पर्यंत बिटकॉइन गेला होता. किंमतीबाबत संवेदनशील म्हणून क्रिप्टोकरन्सी कडे पाहिले जाते. बाजारात बदल होत बिटकॉइनने ही मोठी मजल मारली आहे. मिडिया वृत्तानुसार सिंगापूर येथे डिजिटल असेटचा आज सकाळी ४९९६० डॉलरचा व्यवहार झाला आहे. शेवटी दरात नोव्हेंबर २०२१ मध्ये वाढ होत १९००० डॉलर पर्यंत बिटकॉइन गेला होता.
 
अनेक देशांत क्रिप्टोकरन्सी अधिकृत असली तरी अनेक देशांत या करन्सींना मान्यता नाही. आंतरराष्ट्रीय व्यवहारातील बाजारातील चढ उतार पाहता बिटकॉइन व इतर क्रिप्टोकरन्सी मध्ये गेले २-३ वर्ष मोठे चढउतार पहायला मिळाले. मुख्य प्रवाहातील चलनाला उपाय म्हणून क्रिप्टोकरन्सीला जगात धिम्या गतीने मान्यता मिळत आहे. मागच्या महिन्यातील युएसमधील स्पॉट एक्सचेंज ट्रेडिंग फंडला अधिकृत मान्यता मिळाल्याने बाजारात क्रिप्टोकरन्सी बद्दल आश्वासकता वाढल्याचे एकूण चित्र आहे.
 
मे २०२२ मध्ये बिटकॉइनने तोटा सहन केल्यानंतर, मे २०२२ मध्ये स्टेबलकॉइन युएसडीला मिळालेले अपयश पाहता, नोव्हेंबर २०२२ मध्ये फ्राईड एफटीएफ एक्सचेंजला उतरती कळा लागली होती.
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.