डॉ.रवींद्र शोभणे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव तर मनोविकास प्रकाशन संस्थेस श्री.पु.भागवत पुरस्कार जाहीर

    10-Feb-2024
Total Views | 76

shobhane 
मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने दरवर्षी नामवंत साहित्यिकास विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार व प्रकाशन संस्थेस श्री. पु. भागवत पुरस्कार प्रदान केला जातो. सन 2023 या वर्षासाठी डॉ.रवींद्र शोभणे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार तर पुण्याच्या मनोविकास प्रकाशन या संस्थेस श्री.पु.भागवत पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी ही घोषणा केली. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराचे स्वरुप पाच लक्ष रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे असून श्री.पु.भागवत पुरस्काराचे स्वरुप तीन लक्ष रुपये मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे.
केसरकर यावेळी म्हणाले, "साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकाची विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराकरिता निवड करण्यासाठी तसेच साहित्य निर्मितीमध्ये मोलाचे कार्य करणाऱ्या एका प्रकाशन संस्थेची श्री. पु. भागवत पुरस्कारासाठी निवड करण्याकरिता या पुरस्काराच्या निवड समितीची बैठक 7 फेब्रुवारी, 2024 रोजी झाली. या बैठकीत सर्व निकषांचा समग्र विचार करुन साहित्यिकाचे साहित्य क्षेत्रातील भरीव व गुणात्मक योगदान, त्यांनी केलेले सृजनात्मक स्वरूपाचे वैविध्यपूर्ण लेखन व महाराष्ट्रातील साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रासाठी त्यांचे संस्थात्मक योगदान या मुख्य बाबी विचारात घेऊन डॉ.रवींद्र शोभणे यांची विंदा करंदीकर पुरस्कारासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे."
याबरोबरच श्री.पु.भागवत पुरस्कारासाठी सर्व निकषांचा समग्र विचार करुन पुस्तक प्रकाशन विषयातील विविधता, संस्थेने आजपर्यंत प्रकाशित केलेली ग्रंथांची संख्या व ग्रंथनिर्मिती क्षेत्रातील त्या संस्थेचे भरीव योगदान या मुख्य बाबी विचारात घेऊन मनोविकास प्रकाशन, पुणे या प्रकाशन संस्थेची सर्वानुमते निवड करण्यात आली असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले.
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121