भारताचा माजी कर्णधार, ईडीकडून तब्बल ९ तास चौकशी, नेमकं कारण काय?

    09-Oct-2024
Total Views | 651
mohammad-azharuddin-interrogated-by-ed


मुंबई :    भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांची सक्तवसुली संचालनालया(ईडी)कडून चौकशी करण्यात आली. हैदराबाद क्रिकेट असोसिएशन(एचसीए)मधील कथित आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी अझरुद्दीन यांची ईडीकडून तब्बल ९ तास चौकशी करण्यात आली आहे. एचसीएमधील आर्थिक व्यवहारांत अनियमिततेशी संबंधित चौकशी ईडीने केली आहे.




दरम्यान, याच प्रकरणात ईडीने यासंदर्भात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये छापेमारीदेखील केली होती. त्यानंतर आता माजी कर्णधार आणि काँग्रेस नेता मोहम्मद अजहरुद्दीन यांची नऊ तासांहून अधिक चौकशी केली आहे. ६१ वर्षीय अझरुद्दीन यांना आगामी चौकशीकरिता दि. ०३ ऑक्टोंबरला ईडीसमोर हजर व्हावे लागणार होते. परंतु, वेळ मागत दि. ०८ ऑक्टोबर रोजी हजर राहावे लागणार आहे.

ईडीकडून चौकशी केल्यानंतर मोहम्मद अझरुद्दीन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ईडीकडून जे आरोप करण्यात आले आहेत ते निराधार असून मी चौकशीला जात सहकार्य करत आहे. त्याहून अधिक मला काही बोलयचे नाही. तसेच, तेलंगण पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर या आरोपांमागे माझी प्रतिमा खराब करण्याचा हेतू आहे, असेही मोहम्मद अझरुद्दीन यांनी सांगितले.






अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121