धक्कादायक! लष्कर ए तोयबाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ज्योती मल्होत्राचं १४ दिवस ट्रेनिंग
19-May-2025
Total Views | 96
मुंबई : लष्कर ए तोयबाचे मुख्य प्रशिक्षण केंद्र असलेल्या मुरीदके शहरात ज्योती मल्होत्राने हेरगिरीचे प्रशिक्षण घेतल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आता या घटनेला नवे वळण मिळाले असून याबाबतचे आणखी काही धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.
युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आणि संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तिच्या चौकशीदरम्यान, अनेक धक्कादायक बाबी पुढे येत आहे. पहलगाम हल्ल्याच्या काही दिवस आधी ज्योती मल्होत्रा पाकिस्तानला गेली असून या काळात ती मुरीदके शहरात १४ दिवस वास्तव्यास होती.
लष्कर ए तोयबाचे मुख्य प्रशिक्षण केंद्र असलेल्या मुरीदके शहरात ज्योती मल्होत्राने हेरगिरीचे प्रशिक्षण घेतले. याच शहरात कुख्यात दहशतवादी हाफिज सईदचे घर असल्याचीही माहिती आहे. येथील प्रशिक्षणानंतर तिला पुढील मोहिमेकरिता भारतात पाठवण्यात आले. परंतू, त्याआधीच तिला हरियाणा पोलिसांनी ताब्यात घेतले.
पाकिस्तानमध्ये फिरण्यासाठी ज्योतीला कुठलाही प्रतिबंध घालण्यात आला नाही. ती प्रत्येक ठिकाणी मुक्तपणे फिरत होती. पाकिस्तानकडून तिच्या सुरक्षेची पूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. या संपूर्ण माहितीच्या आधारे ज्योती मल्होत्राचा पहलगाम हल्ल्याशी संपर्क असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत असून त्यादृष्टीने अधिक तपास सुरु आहे.