ज्योती मल्होत्राच्या कारनाम्यांवर वडीलांचा मोठा खुलासा! म्हणाले, "तिने मला..."
19-May-2025
Total Views | 83
मुंबई : ज्योती मल्होत्रा या महिलेला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून यावर आता तिच्या वडीलांनी मोठा खुलासा केला आहे. ज्योती मल्होत्रा पाकिस्तानला गेली याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना ज्योती मल्होत्राचे वडील हरीश मल्होत्रा म्हणाले की, "मला काहीही माहित नव्हते. तिने मला दिल्लीला जात आहे असे सांगितले. तिने मला कधीही काहीही सांगितले नाही. आमच्या घरी तिच्या कोणत्याही मैत्रिणी आल्या नाहीत. काल पोलिसांनी तिला इथे आणले, तिचे कपडे, लॅपटॉप आणि मोबाईल घेऊन निघून गेले. तिने मला काहीही सांगितले नाही. ती घरी व्हिडिओ बनवायची. बाहेर जाताना मला सांगितले नाही. ती दिल्लीला जात आहे, असे मला सांगून गेली," असे ज्योतीचे वडील म्हणाले आहेत.
देशविरोधी कृत्य आणि पाकिस्तानची हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्रा सध्या पोलिस कोठडीत आहे. दरम्यान, ज्योतीचे पहलगाम कनेक्शनही पुढे आले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या ३ महिन्याआधी ज्योती मल्होत्रा श्रीनगर येथे गेली होती. याचवेळी तिने पहलगामलाही भेट दिली. पहलगाम येथील तिचा असाच एक व्हिडीओ शेअर करत नेटकऱ्यांनी ज्योतीने पहलगामची रेकी केली का? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच ऑपरेशन सिंदूर सुरु असताना ज्योती दानिशच्या संपर्कात असल्याचीही माहिती पुढे आली आहे.