नवी दिल्ली : (NEET (UG) 2025 Results Out) राष्ट्रीय चाचणी संस्थे (NTA) ने NEET UG 2025 चा निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. ४ मे ला झालेल्या नीटच्या परीक्षेला जवळपास देशभरातून २१ लाख विद्यार्थी बसले होते. त्या सगळ्यांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आता या निकालानंतर वैद्यकीय प्रवेशासाठी समुपदेशन फेरी पार पडेल, त्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे.
विद्यार्थ्यांना त्यांचा NEET UG 2025 चा निकाल राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या (NTA) वेबसाईटवर पाहता येणार आहे. निकालाची लिंक अधिकृत वेबसाइट https://neet.nta.nic.in वर सक्रिय करण्यात आली आहे. उमेदवार स्कोअरकार्ड आणि रँक तेथे तपासू शकतात.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\