इतिहास अभ्यासक श्रीराम साठे कालवश

    26-Sep-2023
Total Views |


sathe

मुंबई : ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि लेखक श्रीराम विनायक साठे यांचे सकाळी देहावसान झाले. सकाळी साडेसात वाजता वयाच्या 78 व्या वर्षी कल्याण येथे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
श्रीराम साठे बृहन्मुंबई महानगरपालिकेतून मेकॅनिकल इंजिनिअर सेवानिवृत्त झाले होते त्यांना इतिहासाची आवड होती त्यांना इतिहास लेखन व वाचनाची आवड होती थोरले बाजीराव थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आकाशवाणी मुंबई केंद्रावरून श्रुतिका प्रसारित झाल्या होत्या दिवाळी अंकात पेशव्यांवरील कथेस पारितोषिके मिळाली होती ते हौशी नाट्य कलाकारही होते आकाशवाणी व दूरदर्शनवरील संस्कृत व मराठी कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा साध्या सोप्या शब्दात सत्याचे यथार्थ दर्शन घडविणे अतिरंजीत वर्णन न करणे हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य त्यांच्या अनेक कथांना प्रथम पारितोषिके मिळाली आहेत श्रीमंत माधवराव पेशवे यांच्यावर आधारित रमा माधव हे तीन अंकी नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आले होते. निस्वार्थी आत्मसंतोषी निर्णय प्रामाणिक मेहनती व अष्टपैलू व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती मुघल सम्राट हे त्यांचे दुसरे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121