मुंबईतील गणपतींचे दर्शन आता एका क्लिकवर 'हॅशटॅग बाप्पा'च्या माध्यमातून!

    19-Sep-2023
Total Views |
Hashtag Bappa website news

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सव म्हंटला तर बाप्पाचा जयघोष आणि सार्वजनिक मंडळांची ऐट पहायला मिळते. मुंबईतील या गणेश मंडळाचे दर्शन एकाच क्लिक वर आता होऊ शकणार आहे. आपला उत्सव जागतिक दर्जावर पोहचवण्यासाठी आम्ही उचलेलं छोटसं पाऊल हे आहे. 'हॅशटॅग बाप्पा' या संकेतस्थळाद्वारे ते शक्य होणार आहे.
 
मुंबईत चाळ संस्कृतीपासून ते टॉवरपर्यत प्रत्येकाच्या घराघरात आणि मंडळात बाप्पा विराजमान झालेले दिसून येतात. मुंबईतील मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्याच मोठ्या रांगा लागलेल्या असतात. सार्वजनिक गणेश मंडळांची वाढती प्रसिद्धी पाहता, ह्या सर्व गणपतींचे दर्शन घेण्यासाठी दहा दिवस देखील अपुरे पडतात. त्यामुळे राहून गेलेल्या तसेच घरबसल्या आपल्या आवडत्या मंडळातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी "हॅशटॅग बाप्पा" हे संकेतस्थळ ब्रँण्डमेकर या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले आहे. या संकेतस्थळामार्फत मुंबईतील कोणत्याही मानाच्या गणपतीचे एका क्लिकवर लाईव्ह दर्शन घेणे आता शक्य होणार आहे. क्यु आर कोड स्कँन करुन किंवा एन एफ सी कार्ड च्या माध्यमातून मुंबईतील कोणत्याही गणपती मंडळाची सविस्तर माहिती, मंडळाच्या उपक्रमांचा आढावा तसेच थेट प्रक्षेपण द्वारे तुम्ही मिळवू शकता.


'गिरगाव'च्या राजाचे प्रथम मुखदर्शन छत्रपती संभाजी महाराजांच्या उपस्थितीत!
 
'गिरगाव'च्या राजाचे प्रथम मुखदर्शन प्रसंगी छत्रपती संभाजी महाराजांनी मंडळाचे विशेष कौतुक केले, "महाराष्ट्रातील एकमेव मंडळ असेल जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे संवर्धना महत्त्वाचा विषय घेवून काम करतय. गेली ९५ वर्षे शाडू मातीची मुर्ती आणून पर्यावरणाच संरक्षण केल जातय. " याप्रसंगी छत्रपती संभाजी महाराजांच्या शुभहस्ते "हॅशटॅग बाप्पा" ह्या ॲप चे "गिरगावचा राजाचे क्यु आर कोड" चे अनावरण करण्यात आले.
 
"मुंबईमधील सर्व गणपतीचे दर्शन व मंडळाची सविस्तर माहिती एका क्लिकवर मिळणार म्हणजे आपला उत्सव आणखीन प्रभावीपणे जनमानसांत सहजरित्या पोहचेल,"असे याप्रसंगी बोलताना छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितले.ब्रॅण्ड्स मेकर हि संस्था 'हॅशटॅग बाप्पा' हा उपक्रम मुंबई मध्ये राबवत आहे, मुंबईतील १५० हून अधिक नावाजलेल्या गणपती मंडळानी यामध्ये नोंदणी केली आहे,"अशी माहिती संचालक भरत शिंदे यांनी दिली. यावेळी छत्रपती शासन चँरिटेबल ट्रस्ट चे रमेश शहा, विनायक मेदगे, संतोष पवार , मार्गदर्शक पत्रकार शीतल करदेकर आणि गिरगावचा राजा मंडळाचे सचिव गणेश लिंगायत व कार्यकर्ते उपस्थित होते.


'MahaMTB घरगुती ecofriendly गणेशा स्पर्धा'
 
'माझा बाप्पा येणार, घर अंगण त्याच्या आगमनासाठी सजणार', पर्यावरणपूरक आरास मी करणार. आपल्या लाडक्या बाप्पांच्या आगमनाला काही दिवसच उरले आहेत. घरोघरी तयारी सुरू झाली आहे. आपण केलेली बाप्पाची सजावट पर्यावरण पूरक असेल तर, तुम्ही हजारोंची बक्षिसे जिंकू शकता. 'दै. मुंबई तरुण भारत' तर्फे MPCB प्रस्तुत 'MahaMTB घरगुती ecofriendly गणेशा' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


प्रथम पारितोषिक रुपये ५१ हजार रोख, द्वितीय पारितोषिक ३१ हजार रोख, तृतीय पारितोषिक २५ हजार रुपये रोख, असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. स्पर्धेत सहभागी होण्याची पद्धतही सरळ आणि सोप्पी करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://bit.ly/3RpZbSq या लिंकवर क्लिक करुन तुम्ही तुमची नोंदणी करु शकता. नोंदणीसाठी २८ सप्टेंबर ही अंतिम तारीख असेल.


स्पर्धेची नियम व अटी :

१) उत्सवातील मूर्ती शाडू मातीची अथवा नैसर्गिक घटक वापरून तयार केलेली असावी

२) श्रींच्या मूर्तीवरील रंग नैसर्गिक असावेत.

३) उत्सवातील सजावट नैसर्गिक पाने फुले लाकूड कागद अथवा नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार केलेली असावी

४)उत्सवात थर्माकोल आणि प्लास्टिकच्या वापरावर बंदी आहे.
 
५) उत्सवात विजेचा अतिरेकी वापर न करता विजेची बचत करावी.


६) सामाजिक संदेश, देखावा असणाऱ्या सजावटीला प्राधान्य
 
 
७) संपूर्ण उत्सवात सभोवतालच्या पर्यावरणाची आणि निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घ्यावी.
 
 
८) पर्यावरणाचे रक्षण करत या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या लाडक्या बाप्पाच्या सजावटीचे ५ फोटो आणि आपण केलेली सजावट पर्यावरणपूरक कशी आहे, याबद्दलचे तपशील दिलेल्या लिंक वर आम्हाला पाठवा.





 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.