मुंबई : आरोग्य विभागातील महाभरती करिता अर्ज मागविण्यात येत असून दि. १८ सप्टेंबर २०२३ अंतिम मुदत असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील विविध रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी असणार आहे. अधिक माहितीसाठी येथे
क्लिक करा.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागातील विविध रिक्त पदे भरण्याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. त्यास राज्यातील तरुणांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भरतीविषयक अधिसूचनेनुसार अर्ज करण्यासाठी दि. १८ सप्टेंबर २०२३ अंतिम मुदत देण्यात आली असून उमेदवाराने आजच अर्ज करणे बंधनकारक असणार आहे.